आता EV बाईक सुद्धा विसरा, Yamaha ने आणली AI बाईक, लूक तर पाहाच!
- Published by:sachin Salve
Last Updated:
एआय कन्सेप्टवर आधारित बाइक यामागा कंपनी आगामी काळात बाजारात आणू शकते असा अंदाज आहे.
नवी दिल्ली : अनेकांना वाहनांची आवड असते. अनेक जणांना तर महागड्या वाहनांची खरेदी करणं शक्य असतंच असं नाही; पण तरीही नवनव्या तंत्रज्ञानावर आधारित वाहनांबद्दल जाणून घ्यायला खूप जणांना आवडतं. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 हे त्यासाठीचं एक उत्तम ठिकाण. यात अनेक कंपन्यांनी वेगवेगळ्या प्रकारची वाहनं सादर केली. दुसऱ्या कंपनीपेक्षा आपण वेगळं काय दिलं, काय देतो, हे सिद्ध करण्यासाठी प्रत्येक कंपनीची चढाओढ होती. यात यामाहा कंपनीने सर्वांना एक मोठाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या कंपनीने जगातली पहिली एआय बाइक या एक्स्पोमध्ये सादर केली.
यामाहाने या ऑटो एक्स्पोमध्ये आपली Y/AI ही कन्सेप्ट मोटरसायकल वाहनप्रेमींना दाखवली. कंपनी सध्या ही बाइक लाँच करणार नाहीये; मात्र तिचा शो कंपनीने लोकांसमोर सादर केला. या एआय कन्सेप्टवर आधारित बाइक यामागा कंपनी आगामी काळात बाजारात आणू शकते असा अंदाज आहे. ही Y/AI कन्सेप्ट मोटरसायकल म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फ्युचरिस्टिक डिझाइन यांचं चांगलं मिश्रण आहे.
advertisement

कंपनीने असं म्हटलं आहे, की या बाइकचं डिझाइन YZR-M1 वरून प्रेरणा घेऊन केलेलं असून, ती एआय तंत्रज्ञानावर चालणारी फ्युचर बाइक आहे. 2024 साली आलेल्या अॅनिमे टोक्यो ओव्हरराइड या सायन्स फिक्शन वेबसीरिजमध्ये ही बाइक दाखवण्यात आली होती. या बाइकमुळे सर्वांनाच भविष्याची चुणूक दिसली आहे.
advertisement
टीव्हीएस -
टीव्हीएस कंपनीने व्हिजन आयक्यूब कन्सेप्ट ही इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून सादर केली आहे. त्या 3.4 kWh बॅटरी वापरण्यात आली आहे. कंपनीने असा दावा केला आहे, की त्या स्कूटरची खरी रेंज 150 किलोमीटर्स असेल. तिला दोन रिमूव्हेबल रेंज बूस्टर्स लावले, तर रेंज 40 ते 50 किलोमीटर्सने वाढू शकते, असा दावा करण्यात आला आहे.
advertisement
सीएनजी पॉवर्ड स्कूटर-
टीव्हीएस ज्युपिटरने सीएनजी कन्सेप्टवर जगातली पहिली सीएनजी पॉवर्ड स्कूटर सादर केली आहे. त्या स्कूटरमध्ये सीटच्या खाली 1.4 किलोग्रॅमची सीएनजी टाकी आहे. त्याबरोबरच दोन लिटरची पेट्रोलची टाकीही देण्यात आली आहे. कंपनीचा असा दावा आहे, की दोन्ही टाक्या पूर्ण भरल्यानंतर ही स्कूटर 226 किलोमीटर्स अंतर पार करू शकते.
लहान मुलांसाठी इलेक्ट्रिक स्कूटर -
हीरो मोटोकॉर्पने या एक्स्पोमध्ये विदा अॅक्रो हे वाहन सादर केलं. लहान मुलांसाठीचं इलेक्ट्रिक ऑफ रोड वाहन म्हणून त्याकडे पाहिलं जात आहे. विदा अॅक्रो चालवण्यासाठी एका खास ट्रॅकची गरज आहे. त्यात स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 25 किलोमीटर्स आहे.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
January 22, 2025 9:09 PM IST