Apple Event 2025: लाँचआधीच सगळं काही बाहेर आलं, iPhone 17 चे फीचर्स आणि किंमत लीक; Apple फॅन्समध्ये खळबळ

Last Updated:

Apple Event 2025: लाँचला अजून दोन दिवस बाकी असताना iPhone 17 सीरिजची किंमत आणि फीचर्स लीक झाले आहेत. Apple चाहत्यांमध्ये या लीकमुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे.

News18
News18
कॅलिफोर्निया: जगातील सर्वात मोठी टेक कंपनी ऍपल (Apple) 9 सप्टेंबर रोजी आपला मोठा इव्हेंट आयोजित करणार आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी नवीन iPhone 17 सीरिजमधील चार फोन्ससोबतच Watch Series 11, SE आणि AirPods 3 लाँच करण्याची शक्यता आहे. या लाँचला आता फक्त दोन दिवस शिल्लक आहेत आणि या सीरिजबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.
advertisement
iPhone 17 सीरिजची किंमत आणि फीचर्सबद्दल अनेक माहिती लीक झाली आहे. ही माहिती किती खरी आहे हे 9 सप्टेंबरला होणाऱ्या इव्हेंटमध्येच स्पष्ट होईल. चला जाणून घेऊया की या वेळी कंपनी काय खास घेऊन येत आहे.
advertisement
लॉन्च होणार चार नवे फोन्स
गेल्या अनेक वर्षांप्रमाणे या वर्षीही ऍपल चार नवीन फोन्स सादर करणार आहे. मात्र, यावेळी सीरिजमध्ये काही बदल दिसू शकतात. कंपनी iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max लाँच करू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
या वेळी कोणताहीप्लसव्हेरिएंट दिसणार नाही. iPhone 17 मध्ये कंपनी 6.3-इंचचा प्रोमोशन डिस्प्ले देईल. कंपनीने पहिल्यांदाच बेस व्हेरिएंटमध्ये प्रोमोशन डिस्प्ले देण्याची ही पहिलीच वेळ असेल. यात A19 प्रोसेसर दिला जाईल.
advertisement
iPhone 17 Air हा ब्रँडचा आतापर्यंतचा सर्वात पातळ फोन असेल. हा हँडसेट ‘प्लस’ व्हेरिएंटची जागा घेईल आणि यात 6.6-इंचचा डिस्प्ले मिळेल. हा स्मार्टफोनही A19 प्रोसेसरसह लाँच होईल. प्रो आणि प्रो मॅक्सच्या डिझाइनमध्येही यावेळी बदल पाहायला मिळू शकतो. दोन्ही फोन्समध्ये मोठे कॅमेरा मॉड्यूल दिले जाईल. तसेच ४८MP चा टेलीफोटो लेन्स दिला जाऊ शकतो. चांगल्या बॅटरी लाइफसाठी मोठी बॅटरी आणि प्रो सीरिजमध्ये A19 Pro प्रोसेसर मिळेल.
advertisement
किती असेल किंमत?
या वेळी ऍपल आपल्या फोन्सच्या किमतीत वाढ करण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून कंपनीने बेस व्हेरिएंटच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. रिपोर्ट्सनुसार, iPhone 17 सीरिजची किंमत 86,000 रुपयांपासून सुरू होऊ शकते. मात्र, काही रिपोर्ट्समध्ये कंपनी किमतीत कोणताही बदल करणार नाही, असेही म्हटले आहे.
advertisement
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Apple Event 2025: लाँचआधीच सगळं काही बाहेर आलं, iPhone 17 चे फीचर्स आणि किंमत लीक; Apple फॅन्समध्ये खळबळ
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement