दहावी-बारावीचे टेन्शन सोडा, बोर्डाचे ॲप डाऊनलोड करा, परीक्षेसंबंधी मिळेल संपूर्ण माहिती

Last Updated:

दहावी-बारावी या दोन्ही परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या असतात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाने विद्यार्थी, पालक, शिक्षकांना माहिती उपलब्ध व्हावी, या हेतूने मोबाइल 'एमएसबीएसएचएसई' हे ॲप तयार केले आहे.

+
दहावी-बारावीचे title=दहावी-बारावीचे 'टेन्शन' सोडा; 'अॅप डाऊनलोड' करा
/>

दहावी-बारावीचे 'टेन्शन' सोडा; 'अॅप डाऊनलोड' करा

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : दहावी-बारावी या दोन्ही परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या असतात. या परीक्षांची मुलांप्रमाणे पालकांना देखील चिंता असते. या परीक्षेसंबंधी अनेकदा विद्यार्थ्यांसह पालकांना चुकीची माहिती मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होते. हे नुकसान होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाने विद्यार्थी, पालक, शिक्षकांना माहिती उपलब्ध व्हावी, या हेतूने मोबाइल 'एमएसबीएसएचएसई' हे ॲप तयार केले आहे.
advertisement
बोर्डने तयार केलेले ॲप गुगल प्ले स्टोअरवर मोफत स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ॲपवर विद्यार्थी, शाळा आणि शिक्षकांसाठी लॉगिन, उपलब्ध नमुना, प्रश्नपत्रिका, वेळापत्रक, निकाल यांसह अनुषंगिक बाबी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शुल्क परतावा, प्रात्यक्षिक व अंतर्गत गुण या सुविधाही शाळांसाठी असणार आहेत. बोर्डातर्फे तयार केलेल्या ॲपमध्ये मॉडेल प्रश्नपत्रिका असणार आहेत. या प्रश्नपत्रिका ॲपच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनाही डाऊनलोड करता येतील, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सरावही करता येईल.
advertisement
या ॲपमध्ये टाइमटेबल, नोटिफिकेशन्स वेळोवेळी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या ॲपवर विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेळापत्रक, गुणपत्रिका, नमुना प्रश्नपत्रिका, निकाल, शुल्क परतावा, अंतर्गत आणि प्रात्यक्षिक परीक्षेतील गुण आणि इतर उपयुक्त सूचना, अपडेट्स वेळोवेळी मिळणार आहेत.
advertisement
शाळेमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकांसाठीही हे ॲप उपयुक्त असणार आहे. वर्गात विद्यार्थ्यांना शिकवताना जुने संदर्भ देण्यासाठी, प्रश्नपत्रिकांविषयी विद्यार्थ्यांना माहिती देताना हे ॲप वापरता येणार आहे. तसेच पालकांनाही मुलांचा अभ्यास घेताना या ॲपचा उपयोग होऊ शकतो.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'एमएसबीएसएचएसई' या नावाच्या ॲपची निर्मिती केली आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून मोबाइलमध्ये मोफत डाऊनलोड करता येते. ॲप ओपन झाल्यानंतर त्यावर आपली संपूर्ण माहिती भरून ॲप वापरात येते.
advertisement
मराठी बातम्या/करिअर/
दहावी-बारावीचे टेन्शन सोडा, बोर्डाचे ॲप डाऊनलोड करा, परीक्षेसंबंधी मिळेल संपूर्ण माहिती
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement