BMC Home Guard Recruitment : 10 वी पास उमेदवारांना BMC मध्ये नोकरीची संधी; तब्बल 2771 जागांवर होणार भरती, अर्ज कसा व कुठे करायचा?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Home Guard Recruitment 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 10 वी पास असणाऱ्या उमेदवारांना नोकरी करण्याची संधी आहे. महानगरपालिकेकडून 2771 होम गार्ड पदांची भरती करण्यात येणार आहे.
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 10 वी पास असणाऱ्या उमेदवारांना नोकरी करण्याची संधी आहे. महानगरपालिकेकडून 2771 होम गार्ड पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध झाली असून सदर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 10 पास असणाऱ्या व्यक्तींसाठी ही सुवर्णसंधी असून आवश्यक कागदपत्रांसह 10 जानेवारी पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. मग आता या भरतीसाठी आवश्यक पात्रता, वयोमार्यादा काय असणार? हेच आपण सविस्तरपणे जाणून घेऊ?
पदाचे नाव काय आहे?
महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार होमगार्ड या पदासाठी सदर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता काय आहे?
जाहिरातीनुसार सदर उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
पदसंख्या किती असणार?
एकूण 2771 पदांवर भरती केली जाणार आहे.
advertisement
वयोमर्यादा
जाहिरातीनुसार 20 ते 50 वर्ष वय देण्यात आले आहे.
आवश्यक कागदपत्रे
रहिवासी प्रमाणपत्र
शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र (10वीचे प्रमाणपत्र)
जन्मतारखेचा पुरावा
शाळा सोडल्याचा दाखला
3 महिन्याच्या आतील पोलिस चारित्र्य प्रमाणपत्र
अर्ज कसा करावा?
view commentsअर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम BMC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. नंतर ऑनलाइन पद्धतीने सविस्तर माहिती भरून अर्ज करावा लागेल. अर्जाची अंतिम तारीख ही 10 जानेवारी 2025 असणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 29, 2024 8:58 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
BMC Home Guard Recruitment : 10 वी पास उमेदवारांना BMC मध्ये नोकरीची संधी; तब्बल 2771 जागांवर होणार भरती, अर्ज कसा व कुठे करायचा?


