Pune Mahanagarpalika Recruitment 2025 : परीक्षा न देताच पुणे मनपामध्ये नोकरीची संधी! 80,000 पगार, भरती प्रक्रिया कशी होणार?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Career News : पुणे महानगरपालिकेमार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये "वरिष्ठ निवासी," "शिक्षक," आणि "कनिष्ठ निवासी" अशा एकूण 29 पदांची नियुक्ती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीद्वारे सहभागी व्हावे अशी माहिती पुणे महानगरपालिकेने दिली आहे.
पुणे : पुणे महानगरपालिकेमार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये "वरिष्ठ निवासी," "शिक्षक," आणि "कनिष्ठ निवासी" अशा एकूण 29 पदांची नियुक्ती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीद्वारे सहभागी व्हावे अशी माहिती पुणे महानगरपालिकेने दिली आहे. मुलाखती 13 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत.
रिक्त पदांची माहिती
वरिष्ठ निवासी - 15 जागा
शिक्षक - 02 जागा
कनिष्ठ निवासी - 12 जागा
शैक्षणिक अर्हता काय?
प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचून आवश्यक कागदपत्रे आणि अर्हता तपासाव्यात.
वयोमर्यादा किती?
उमेदवारांचे वय 38 ते 45 वर्षांच्या दरम्यान असावे. अधिक माहिती जाहिरातीत नमूद आहे.
वेतनश्रेणी
वरिष्ठ निवासी - रु. 80,250/- प्रतिमाह
advertisement
शिक्षक - रु. 64,551/- प्रतिमाह
कनिष्ठ निवासी - रु. 64,551/- प्रतिमाह
निवड प्रक्रिया कशी होणार?
उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर आवश्यक मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ, पुणे - 411011
दरम्यान या भरती प्रक्रियेतील अधिकृत माहितीसाठी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला भेट द्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 12, 2025 10:59 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
Pune Mahanagarpalika Recruitment 2025 : परीक्षा न देताच पुणे मनपामध्ये नोकरीची संधी! 80,000 पगार, भरती प्रक्रिया कशी होणार?





