Railways Recruitment 2025 : रेल्वेमध्ये 1000+ जागांसाठी भरती, 1 लाखापर्यंत मिळणार पगार, अर्ज कसा कराल?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Career News : भारतीय रेल्वेने रेल्वे मंत्रालय आणि वेगवेगळ्या विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी अर्ज 7 जानेवारी 2025 पासून सुरू होतील आणि इच्छुक उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 फेब्रुवारी 2025 निश्चित करण्यात आली आहे.
मुंबई : भारतीय रेल्वेने रेल्वे मंत्रालय आणि वेगवेगळ्या विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी अर्ज 7 जानेवारी 2025 पासून सुरू होतील आणि इच्छुक उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 फेब्रुवारी 2025 निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
एकूण पदसंख्या
पदव्युत्तर शिक्षक (PGT शिक्षक): 187 पदे
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT शिक्षक): 338 पदे
वैज्ञानिक पर्यवेक्षक (अर्गोनॉमिक्स आणि प्रशिक्षण): 03 पदे
मुख्य विधी सहाय्यक: 54 पदे
सरकारी वकील: 20 पदे
शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक : 18 पदे
वैज्ञानिक सहाय्यक/प्रशिक्षण : 02 पदे
कनिष्ठ अनुवादक हिंदी : 130 पदे
वरिष्ठ प्रचार निरीक्षक: 03 पदे
advertisement
कर्मचारी आणि कल्याण निरीक्षक : 59 पदे
ग्रंथपाल : 10 पदे
संगीत शिक्षक (महिला) : 03 पदे
प्राथमिक रेल्वे शिक्षक: 188 पदे
सहाय्यक शिक्षक (महिला कनिष्ठ शाळा) : 02 पदे
प्रयोगशाळा सहाय्यक/शाळा : 07 जागा
प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड III (रसायनशास्त्रज्ञ आणि धातूशास्त्रज्ञ) : 12 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदानुसार 12 वी ते पदव्युत्तर असणे आवश्यक आहे. अध्यापन पदांसाठी उमेदवाराने B.Ed/D.El.Ed/TET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
advertisement
वयोमर्यादा किती
पदानुसार उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 33 ते 48 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत मिळेल.
अर्ज फी
उमेदवारांनी अर्जासोबत श्रेणीनिहाय शुल्क जमा करणे आवश्यक आहे. सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागेल, तर SC, ST, PWD, महिला आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी 250 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. अर्ज शुल्काशिवाय अर्ज अपूर्ण मानले जातील आणि ते नाकारले जातील.
advertisement
अर्ज कसा कराल?
view commentsया भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 7 जानेवारीपासून सुरू होणार असून 5 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांनी वेळेवर अर्ज करावेत. भरतीची तारीख निघून गेल्यानंतर उमेदवाराला अर्ज करण्याची संधी मिळणार नाही. अधिक तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 07, 2025 10:54 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
Railways Recruitment 2025 : रेल्वेमध्ये 1000+ जागांसाठी भरती, 1 लाखापर्यंत मिळणार पगार, अर्ज कसा कराल?


