आई शेतमजूर तर वडील ट्रॅक्टर ड्रायव्हर, पण मुलगा बनला अधिकारी, पाहा दीपकच्या जिद्दीची कहाणी
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
उराशी ध्येय बाळगून केलेल्या कठोर परिश्रमाला निश्चितच यश मिळते. या तरुणाची जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मंत्रालय क्लर्क आणि कर सहाय्यक या दोन्ही पदांवर निवड झाली आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : हलाखीच्या परिस्थितीवर मात करत एका गरीब मजुराच्या होतकरू मुलाने स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले आहे. आई दुसऱ्याच्या शेतात शेतमजुरीने कामाला जायची तर वडील ट्रॅक्टर ड्रायव्हर होते. उराशी ध्येय बाळगून केलेल्या कठोर परिश्रमाला निश्चितच यश मिळते. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेजबाभूळ गावात राहणाऱ्या दीपक माळीने हे सिद्ध करून दाखवलंय. या तरुणाची जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मंत्रालय क्लर्क आणि कर सहाय्यक या दोन्ही पदांवर निवड झाली आहे.
advertisement
दीपक माळी यांचे वडील ट्रॅक्टर चालक आहेत. तर आई दुसऱ्यांच्या शेतात शेतमजुरीने कामाला जायची. दीपक यांचे प्राथमिक शिक्षण शेजबाभूळ गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे. माध्यमिक शिक्षण अंकोली येथे झाले आहे. तर पदवीचे शिक्षण पंढरपूर येथे झाले आहे. दीपक यांची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. दीपक यांना सर्वात जास्त पाठबळ आत्याचा मुलगा यांचा मिळाला. म्हणून त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. जर त्यांची साथ मिळाली नसती तर कुठेतरी कामाला दीपक गेला असता.
advertisement
तसेच स्पर्धा परीक्षेच्या जगात दीपक माळी यांनी पाठवले तेव्हा त्यांच्या लहान भावाने दीपक यांच्या स्पर्धा परीक्षेचा खर्च उचलला म्हणून आज स्पर्धा परीक्षा यशस्वी झाली आहे. दीपक हा दररोज सहा ते आठ तास स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. कोणत्याही नातेवाईकांचा कार्यक्रम असो किंवा इतर कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाला न जाता फक्त आणि फक्त स्पर्धा परीक्षेची तयारी दीपक करत होता.
advertisement
दीपक माळीच्या यशामुळे गावकऱ्यांनी मोठ्या जल्लोषात त्याचे स्वागत केले. आई, वडील आणि लहान भावाने खंबीर साथ दिल्याने दीपकने यशाचे शिखर गाठले आहे. मोठ्या पदावर पोहोचलो तरी गरिबी कधीच विसरणार नाही, असा मत दीपक यांनी व्यक्त केलं आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Mar 07, 2025 1:51 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
आई शेतमजूर तर वडील ट्रॅक्टर ड्रायव्हर, पण मुलगा बनला अधिकारी, पाहा दीपकच्या जिद्दीची कहाणी






