अल्पवयीन मुलीचं 23 वर्षे मोठ्या पुरुषावर प्रेम, घरातून केलं पलायन, पडक्या घरात आढळली भयावह अवस्थेत
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Amravati: अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाण्याच्या एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका प्रेमीयुगुलांनी विष प्राशन करत आयुष्याचा शेवट करण्याचा प्रयत्न केला आहे.
संजय शेंडे, प्रतिनिधी अमरावती: अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाण्याच्या एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका प्रेमीयुगुलांनी विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. एका पडक्या इमारतीत दोघंही बेशुद्धावस्थेत आढळले. यानंतर दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ही घटना अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. येथील एका जीर्ण इमारतीत एका विवाहित 39 वर्षीय पुरुषासह 16 वर्षीय अल्पवयीन मुलीनं विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने दोघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मिळालेला माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी आणि विवाहित पुरुष दोघंही अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील रहिवाशी आहेत. दोघंही मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होते. याप्रकरणी दोघांच्या कुटुंबीयांनी दोघांचा सर्वत्र शोध घेतला, पण त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. मागील तीन दिवसांपासून कुटुंबीय शोध घेत होते.
advertisement
दरम्यान, रविवारी सायंकाळी उशिरा अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तिवसा नजीक तळेगाव ठाकूर फाटा परिसरात एक जीर्ण इमारत आहे. याच इमारतीत दोघेजण बेशुद्धावस्थेत आढळून आले. दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याची माहिती आहे. याच प्रेमातून त्यांनी घरातून पलायन केल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर तिसऱ्या दिवशी दोघंही बेशुद्धावस्थेत आढळले, दोघांनी नेमकं विष प्राशन का केलं? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
May 19, 2025 10:03 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
अल्पवयीन मुलीचं 23 वर्षे मोठ्या पुरुषावर प्रेम, घरातून केलं पलायन, पडक्या घरात आढळली भयावह अवस्थेत









