प्रेमाच्या जाळ्यात ओढत बनवला अश्लिल व्हिडिओ, सोशल मीडियावर पोस्टही केला अन्..., धक्कादायक घटना
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
crime news - न्हाव्याचे काम करणाऱ्या प्रियकराने हे कृत्य केले. शहबाज मिर्जा असे या आरोपीचे नाव आहे. प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्याने प्रेयसीचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला.
रोबिन मॉल, प्रतिनिधी
श्रीनगर गढवाल - गेल्या काही दिवसात अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचा अश्लिल व्हिडिओ बनवला.
उत्तराखंडच्या पौडी येथील पैठाणीमध्ये न्हाव्याचे काम करणाऱ्या प्रियकराने हे कृत्य केले. शहबाज मिर्जा असे या आरोपीचे नाव आहे. प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्याने प्रेयसीचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आरोपी आणि तरुणी घरातून फरार झाले. तरुणीला कोटद्वार येथून ताब्यात घेण्यात आले.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, पैठाणी बाजारमध्ये न्हाव्याचे काम करणारा शहबाज मिर्झा याने आपल्या घरमालकाच्या नातेवाईकाच्या मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तसेच त्याने तरुणीचा अश्लिल व्हिडिओ बनवला. या व्हिडिओला त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला. जेव्हा तरुणीला हा प्रकार माहिती झाला. तेव्हा तिने आणि तिच्या प्रियकराने पैठाणी येथून पळ काढला.
advertisement
तर स्थानिकांसमोर हे प्रकरण येताच मोठा गोंधळ सुरू झाला. पैठाणी बाजार बंद करण्यात आला. तसेच स्थानिक व्यापाऱ्यांनी या घटेचा निषेध व्यक्त करत धरणे आंदोलन केले. हिंदूत्ववादी संघटनेचे नेते लखपत सिंह भंडारी यांनीही पैठाणी पोहोचून स्थानिक लोकांना विशिष्ट समुदायातील लोकांना घर-दुकान भाड्याने न देण्याचे आवाहन केले. लोकांनी सतर्क होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
advertisement
पोलिसांनी तरुणीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला बिजनौर येथून अटक करण्यात आल्याची माहिती स्थानिक एसएसपी लोकेश्वर सिंह यांनी दिली. तसेच तरुणीलाही कोटद्वार येथून सुस्थितीत ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Location :
Uttarakhand (Uttaranchal)
First Published :
November 09, 2024 5:30 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
प्रेमाच्या जाळ्यात ओढत बनवला अश्लिल व्हिडिओ, सोशल मीडियावर पोस्टही केला अन्..., धक्कादायक घटना