आधी बहिणीला छेडलं मग भावाला संपवलं, गावगुंडांच्या कृत्याने धाराशिव हादरलं!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Dharashiv: धाराशिव शहरातील बालाजीनगरात एका १८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली.
धाराशिव: धाराशिव शहरातील बालाजीनगरात एका १८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. परिसरातील गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने लोखंडी रॉड, कोयता आणि काठीने मारहाण करत तरुणाचा जीव घेतला. धक्कादायक बाब म्हणजे तरुणाची हत्या झाल्यानंतर दोन दिवस पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नव्हता. दोन दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला.
लहू चौधरी, अंकुश चौधरी, किशोर सुभाष चौधरी आणि अन्य एक व्यक्ती असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. तर मारुती शिवाजी इटाळकर असं हत्या झालेल्या १८ वर्षीय तरुणाचं नाव आहे. गुरुवारी 8 मेला आरोपींनी मारुतीला लोखंडी रॉड, कोयता आणि लाकडी काठीने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत मारुतीचा मृत्यू झाला.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी मयत इटाळकरच्या बहिणीची छेड काढली होती. त्यामुळे इटाळकर आपला मित्र समर्थ जाधव याला घेऊन आरोपींकडे जाब विचारायला गेला होता. दोघंही गुरुवारी रात्री साडे सात वाजता बालाजीनगर परिसरातील प्रियदर्शनी दूध डेअरीच्या मागे गेले होते. यावेळी आरोपींनी बाचाबाची करत दोघांना मारहाण करायला सुरुवात केली. हा वाद विकोपाला गेल्यानंतर चारही आरोपींनी इटाळकरला बेदम मारहाण केली. या मारहाणीत इटाळकरचा मृत्यू झाला.
advertisement
हत्येची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे नातेवाइकांनी इटाळकरचा मृतदेह धाराशीव पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आणला. येथे मृताच्या नातेवाइकांनी आक्रोश केला. पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला. ८ तारखेला हत्या झाल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच १० तारखेला पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
May 12, 2025 2:12 PM IST