CCTV लाच फसवलं, 14 कॅमरे, पण चोरट्यांनी मारला मोठा डल्ला, तुळजापुरात नेमकं घडलं काय?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Dharashiv News: तुळजापूर तालुक्यात तब्बल 14 सीसीटीव्ही कॅमरांची नजर चुकवत चोरट्यांनी मोठी चोरी केलीये. 3 लाख 30 हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
धाराशिव: सध्याच्या काळात सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातोय. चोरीच्या घटना टाळण्यासाठी अगदी ग्रामीण भागात देखील सीसीटीव्ही कॅमेरांचा वापर वाढला आहे. परंतु, तुळजापूर तालुक्यातील पांगरदवाडीत 14 सीसीटीव्हींची नजर चुकवून चोरट्यांनी डाव साधला. बंद घराच्या दरवाजाची कडी-कोयंडा तोडून मोठा डल्ला मारला. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 3 लाख 30 हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना पुढे आलीये.
नेमकं घडलं काय?
तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ शंकर डोंगरे यांचं घर आहे. रात्रीचं जेवण करून कुंटुंबातील सदस्य झोपण्यासाठी घराच्या स्लॅबवर गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञातांनी दरवाजावरील कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. यानंतर कपाट तोडले आणि आतील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून सुमारे 3 लाख 30 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला.
advertisement
पहाटेच्या सुमारास घर फोडल्याचा प्रकार उघड झाला. त्यानंतर पोलिसांना घटनेबाबत माहिती देण्यात आली. फॉरेन्सिक व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळी पाहणी केली. तसेच चोरट्यांचा माग शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, पण हाती काहीच लागले नाही.
सीसीटीव्ही फेल
गावात एवढी मोठी चोरीची घटना झाली. परंतु, गावातील 14 सीसीटीव्ही कॅमेरांच्या नजरेत ती दिसली नाही. पांगरदवाडी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने गावात 14 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र, सर्व कॅमेऱ्यांची नजर चुकवत चोरट्यांनी घर फोडले आणि 3 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
May 02, 2025 1:07 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
CCTV लाच फसवलं, 14 कॅमरे, पण चोरट्यांनी मारला मोठा डल्ला, तुळजापुरात नेमकं घडलं काय?