त्याच्या प्रेमात वेडी झाली, हर्षदाची झाली जीनत फातिमा; पण नंतर त्याने रंग दाखवला!

Last Updated:

हर्षदा आधीपासूनच विवाहित होती. नंतर तिचा घटस्फोट झाला. यानंतर तिला पब्जी खेळण्याचे व्यसन लागले. तसेच या माध्यमातून एक दिवस तिची मुरादाबाद येथील फुजैल याच्याशी मैत्री झाली. मग हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

हर्षदा आणि फुजैल
हर्षदा आणि फुजैल
पीयूष शर्मा, प्रतिनिधी
मुरादाबाद : पबजीच्या खेळाचं अनेकांना इतकं वेड लागलेलं दिसून येते की आपल्या जीवाची सुद्धा पर्वा राहत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार एका तरुणीसोबत घडला आहे. पब्जीच्या माध्यमातून मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर मात्र, आता ही तरुणी जगण्या-मरण्याचा संघर्ष करत आहे.
महाराष्ट्राच्या हर्षदा मिश्रा हिची ही कहाणी आहे. 2022 मध्ये पब्जी खेळताना तिची मुरादाबाद येथील मोहम्मद फुजैल याच्याशी मैत्री झाली. हर्षदा ही महाराष्ट्राच्या घाटकोपर येथील रहिवासी आहे. तर मोहम्मद फुजैल हा मुरादाबाद येथील गलशहीद येथील रहिवासी आहे. पब्जी खेळताना ते दोन्ही एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्यातील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर हर्षदा ही फुजैल याला भेटायला मुंबईहून मुरादाबादला पळून आली. त्यानंतर 2022 मध्ये दोघांनी निकाह केला आणि ती हर्षदापासून जीनत फातिमा बनली. मात्र, काहीच दिवसांनी तिने आपल्या आईला सांगितले की, तिला मारहाण केली जात आहे.
advertisement
लठ्ठपणापासून ते हाय ब्लडप्रेशरपर्यंत, फूल एक फायदे अनेक, 22 आजारांवर फायदेशीर
गेल्या 17 एप्रिल रोजी तिचा पती फुजैल याने तरुणीच्या आईला फोन करुन सांगितले की, त्यांच्या मुलीने गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हर्षदाला तत्काळ एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही फुजैल आणि त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. हर्षदाची अवस्था आता गंभीर आहे. सध्या ती व्हेंटीलेटरवर असून जगण्या मरण्याचा संघर्ष करत आहे.
advertisement
दरम्यान, हर्षदाची आई माधुरी मिश्रा यांनी सांगितले की, हर्षदा आधीपासूनच विवाहित होती. नंतर तिचा घटस्फोट झाला. यानंतर तिला पब्जी खेळण्याचे व्यसन लागले. तसेच या माध्यमातून एक दिवस तिची मुरादाबाद येथील फुजैल याच्याशी मैत्री झाली. मग हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोन्ही कॉलवर बोलू लागले. एक दिवस तिच्या आईने तिला नकार दिला. त्यामुळे ती तिच्या आजीच्या घरी चालली गेली. मात्र, काही दिवसांनी कळले की, आजीला कामानिमित्त बाहेर सांगून ती घर सोडून मुरादाबादला निघून आली. यानंतर आणखी काही दिवसांनी तिने फुजैलसोबत लग्न केल्याचे समोर आले. यातच आता दोन दिवसांपूर्वी फोन आला की, तिने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आता तिची प्रकृती गंभीर असून ती कोमामध्ये आहे.
advertisement
केमिस्ट्रीमध्ये 100 पैकी 100 मार्क्स, कोणत्याही कोचिंगविना गरीब शेतकऱ्याची पोरगी राज्यात पहिली, सांगितलं यशाचं हे रहस्य
डॉक्टरांनी सांगितले की, जीनत फातिमा (हर्षदा मिश्रा) हिला 16 तारखेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या को 16 तारीख को उनके अस्पताल आई थी. गळ्यावर तिने गळफास घेतल्याची खूण होती. तिची प्रकृती अत्यंत नाजूक होती. ती कोमामध्ये गेल्याची स्थिती होती, तिला तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. गळफास घेतल्याने तिच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही आहे. त्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होत आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
त्याच्या प्रेमात वेडी झाली, हर्षदाची झाली जीनत फातिमा; पण नंतर त्याने रंग दाखवला!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement