एका खोलीत 4 जणांचे मृतदेह... हत्या की आत्महत्या? पोलिसांनाही कळेना, नेमकं प्रकरण काय?

Last Updated:

एका कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये वसंत पटेल, त्यांची पत्नी भारती, मुलगी सजल आणि मुलगा कियांश यांचा...

Crime News
Crime News
छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे, जिथे एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केली आहे. मृतकांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला.
संपूर्ण कुटुंबाने संपवलं जीवन
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बाघबहारा परिसरातील आहे. बाघबहारा येथील सरकारी क्वार्टरमध्ये सामूहिक आत्महत्येचं हे प्रकरण आहे. मृतकांची ओळख वसंत पटेल, त्यांची पत्नी भारती पटेल, मुलगी सेजल आणि मुलगा कियांश अशी पटली आहे. बसंत पटेल हे आदिवासी कल्याण विभागाच्या ब्लॉक ऑफिसमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते.
एक खोली आणि 4 जणांचा मृतदेह
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक. अतिरिक्त पोलीस अधीक्षक, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे. बसंत पटेल यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला, तर त्यांची पत्नी भारती पटेल, मुलगी सेजल आणि मुलगा कियांश यांचे मृतदेह बेडवर आढळले. पत्नी आणि दोन मुलांनी विषारी पदार्थ प्राशन केले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
advertisement
...पण हत्या की आत्महत्या
प्राथमिक अंदाज असल्याने या प्रकरणाची नोंद आत्महत्येची म्हणून केली जात आहे. बसंत हे आदिवासी कल्याण विभागाच्या ब्लॉक ऑफिसमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते. सध्या पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी तपास करत आहेत. आता शवविच्छेदन अहवालानंतरच ही आत्महत्या आहे की हत्या हे स्पष्ट होईल.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
एका खोलीत 4 जणांचे मृतदेह... हत्या की आत्महत्या? पोलिसांनाही कळेना, नेमकं प्रकरण काय?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement