बीड गोळीबार प्रकरण: पुण्यात मध्यरात्री सिनेस्टाईल पाठलाग, तिघांना ठोकल्या बेड्या
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Gun Firing in Beed : बीडमध्ये मागील आठवड्यात घडलेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड : मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात हत्या, गोळीबार आणि अपहरणाच्या विविध घटना उघडकीस येत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं आहे. अशात बीडमध्ये मागच्या आठवड्यात एक गोळीबाराची देखील घटना घडली होती. बीड शहरातील इमामपूर भागात विश्वास डोंगरे नावाच्या व्यक्तीच्या घरात घुसून काहींनी बेछूट गोळीबार केला होता. या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.
या प्रकरणात आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोळीबार प्रकरणातील कुख्यात आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. बुधवारी रात्री उशिरा बीड स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यात पाठलाग करून आरोपींना अटक केली. अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवाई असे अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.
पोलिसांनी आरोपी ओंकारला बीडमधून तर अक्षय आठवले आणि मनीष क्षीरसागरला पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. मनीष क्षीरसागर आणि अक्षय आठवलेवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मागील आठवड्यात त्यांनी डोंगरे कुटुंबावर बेछूट गोळीबार केला होता, यात विश्वास डोंगरे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सध्या संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत.
advertisement
आरोपींनी जुन्या वादाची कुरापत काढून हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आता तीन आरोपींना अटक केल्यामुळे गोळीबाराचं खरं कारण समोर येऊ शकतो. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही आरोपी अजून मोकाट आहेत. त्यांच्या अटकेची मागणी केली जात आहेत. अशात बीडमध्ये मागच्या आठवड्यात घडलेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांना मोठी कारवाई करत तिघांना अटक केली आहे.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
December 19, 2024 1:22 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
बीड गोळीबार प्रकरण: पुण्यात मध्यरात्री सिनेस्टाईल पाठलाग, तिघांना ठोकल्या बेड्या