नवऱ्याने आणले 500 रुपयांचे फटाके, बायकोला आला राग, दोघांच्या वादात घडली हादरवणारी घटना
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
crime news - एका मजूर दाम्पत्यामध्ये फटाके खरेदीच्या मुद्द्यावरून वाद झाला. नर्बेसिंग मेडा असे पतीचे तर भूरीबेन असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. दिवाळीसाठी पतीने फक्त 500 रुपयांचे फटाके आणले होते. मात्र, घरी आल्यावर फटाके पाहून पत्नीला खूप राग आला.
मोरबी (गुजरात) : दिवाळीचा सण सुरू झाला असून सर्वत्र दिवाळीच्या सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळी म्हटल्यावर सर्वत्र फटाके फोडले जातात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना विविध प्रकारचे फटाके फोडायला आवडते. मात्र, यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
फटाके खरेदीवरुन पती पत्नीमध्ये वाद झाला आणि याच वादातून पतीने पत्नीची हत्या केली. गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील या घटनेने दिवाळीच्या सणावर मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोरबीत राहणाऱ्या एका मजूर दाम्पत्यामध्ये फटाके खरेदीच्या मुद्द्यावरून वाद झाला. नर्बेसिंग मेडा असे पतीचे तर भूरीबेन असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. दिवाळीसाठी पतीने फक्त 500 रुपयांचे फटाके आणले होते. मात्र, घरी आल्यावर फटाके पाहून पत्नीला खूप राग आला. इतके सारे फटाके का आणले आहेत, असे पत्नीने विचारल्यावर दोघांमध्ये वाद सुरू झाला.
advertisement
हा वाद इतका टोकाला गेला की, दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. यानंतर या वादाची परिणाम एका भयंकर घटनेत झाले. पती नर्बेसिंग याने पत्नीवर हल्ला केला. या ती गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
advertisement
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीविरोधात तक्रार दाखल केली असून मृताच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
view commentsLocation :
Morbi (Morbi),Rajkot,Gujarat
First Published :
October 30, 2024 6:49 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
नवऱ्याने आणले 500 रुपयांचे फटाके, बायकोला आला राग, दोघांच्या वादात घडली हादरवणारी घटना


