धाराशिव: चोर सोडून संन्याशाला फाशी! मुलाच्या गुन्ह्यासाठी बापाला त्रास, पोलिसाच्या छळामुळे वडिलांनी संपवलं

Last Updated:

Crime in Dharashiv: धाराशिव तालुक्यातील वाघोली गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका व्यक्तीने पोलिसांनी दिलेल्या त्रासातून आत्महत्या केली आहे.

News18
News18
बालाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव: धाराशिव तालुक्यातील वाघोली गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका व्यक्तीने पोलिसांनी दिलेल्या त्रासातून आत्महत्या केली आहे. मुलाने केलेल्या एका गुन्ह्यासाठी पोलिसांनी पीडित व्यक्तीला पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली. यावेळी पोलिसांनी शिवीगाळ करत अपमानास्पद वागणूक दिली. यामुळे अस्वस्थ झालेल्या व्यक्तीने गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला आहे.
काकासाहेब खडके असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. त्यांचा मुलगा धीरज काकासाहेब खोडके हा एका चेन स्नॅचिंग प्रकरणातील आरोपी आहे. काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यात चैन स्नॅचिंग प्रकरणी धीरज काकासाहेब खडकेसह अन्य एका आरोपीवर कलम 304 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींनी एका अपंग महिलेच्या गळ्यातील चेन चोरून पळ काढला होता. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.
advertisement
या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून गुन्हा दाखल केला होता. तेव्हा पासून पोलीस धीरजचा शोध घेत होते. पण त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. या प्रकरणात धीरजचा शोध घेताना पोलिसांनी त्याचे वडील काकासाहेब खडके यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यांना दिवसभर पोलीस ठाण्यात चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला. तसेच चौकशी करत असताना शिवीगाळ करत अपमानास्पद वागणूक देण्यात आली.
advertisement
एवढंच नव्हे तर पोलीस काकासाहेब यांना घेऊन त्यांच्या विविध नातेवाईकांच्या घरी गेले आणि त्या ठिकाणी आरोपी धीरजचा शोध घेण्यात आला. मुलानं केलेल्या गुन्ह्यासाठी काकासाहेब यांना मिळालेल्या या वागणुकीतून व्यथित झालेल्या काकासाहेब यांनी रविवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. या बाबतचा आरोप मयताच्या कुटुंबीयांनी केला आहे. या सगळ्या प्रकरणामुळे बार्शी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
धाराशिव: चोर सोडून संन्याशाला फाशी! मुलाच्या गुन्ह्यासाठी बापाला त्रास, पोलिसाच्या छळामुळे वडिलांनी संपवलं
Next Article
advertisement
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला; पाहा कधीही न पाहिलेले फोटो
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला
  • ज्याच्यावरून धुरंधर साकारला गेला तो चौधरी असलम कोण होता?

  • सिगारेट, पिस्तूल आणि ‘हवा-हवा’ – धुरंधरमागची खरी कहाणी थरकाप उडवणारी

  • एक माणूस, एक शहर आणि अखेरचा स्फोट – धुरंधरमागची खरी स्टोरी

View All
advertisement