Nagpur: 42 वर्षांची आई, 20 वर्षांची मुलगी, ब्लॅकमेल करत नराधमाचा मायलेकीवर अत्याचार!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Nagpur: नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीने एका विवाहित महिलेसह तिच्या 20 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे.
नागपूर: नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीने एका महिलेसह तिच्या २० वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडित मायलेकींचे अश्लील व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. हा सगळा प्रकार पीडित महिलेच्या लहान मुलीच्या लक्षात आला, यानंतर पीडितेनं जरीपटका पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय पीडित महिला दोन मुलींची आई आहे. ती नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुलीसोबत वास्तव्याला आहे. पीडितेचा पती मद्यपी असून तो दुसऱ्या बाहेरगावी वास्तव्याला असतो. दहा वर्षांपूर्वी पीडितेची चालक असलेल्या आरोपीसोबत ओळख झाली होती. नंतरच्या काळात या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं.
यानंतर आरोपीनं पीडित महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि याचे अश्लील व्हिडीओज शूट केले. हेच व्हिडीओज व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं पीडित महिलेच्या मोठ्या मुलीला लक्ष्य केलं. आईचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेच्या मुलीचेही अश्लील व्हिडीओ काढले. हे व्हिडीओ दाखवून त्याने पुन्हा पीडित महिलेला ब्लॅकमेल केला. मागील अनेक महिन्यांपासून आरोपी अशाच प्रकारे ब्लॅकमेल करत मायलेकींचं लैंगिक शोषण करत होता.
advertisement
आईची बदनामी टाळण्यासाठी मुलीनं देखील आरोपीच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. त्याने वारंवार मुलीसह आईचं लैंगिक शोषण केलं. पीडित मायलेकींनी सगळ्या मागण्या मान्य करूनही आरोपीचं मन भरलं नाही. त्याने दोघींचे अश्लील व्हिडीओज इन्स्टाग्रामवर अपलोड केले. यानंतर हा सगळा प्रकार पीडितेच्या लहान मुलीच्या लक्षात आला. यानंतर महिलेनं तातडीने पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
February 24, 2025 2:40 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Nagpur: 42 वर्षांची आई, 20 वर्षांची मुलगी, ब्लॅकमेल करत नराधमाचा मायलेकीवर अत्याचार!


