अमरावती: मठात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, पीडितेच्या फोनमध्ये आढळले आक्षेपार्ह Video
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Amravati: अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे एका अल्पवयीन मुलीवर सुरेंद्रमुनी तळेगावकर महाराजांच्या मठातील तळघरात सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
संजय शेंडे, प्रतिनिधी अमरावती : अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे एका अल्पवयीन मुलीवर सुरेंद्रमुनी तळेगावकर महाराजांच्या मठातील तळघरात सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. यामध्ये सुरेंद्र मुनी तळेगावकर महाराज, बाळकृष्ण देसाई, पीडित मुलीचा मामा आणि मावशीचा सहभाग आहे. या चारही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना 24 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीचा मोबाईल जप्त करत त्याची तपासणी केली असता या अत्याचाराचे आक्षेपार्ह व्हिडीओ सापडलेले आहेत. या आक्षेपार्ह व्हिडिओची आता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी केली जाणार आहे. या प्रकरणी आता बालसंरक्षण समितीचे अधिकारी देखील मठात पोहोचले असून त्यांनी संपूर्ण चौकशीला सुरुवात केलेली आहे. या संपूर्ण धक्कादायक प्रकाराने अमरावती जिल्ह्यात प्रचंड खळबळ आलेली आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय ?
अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील सुरेंद्रमुनी तळेगावकर महाराजाच्या मठात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. 75 वर्षी मुनीसह त्याच्या सहकाऱ्याने पीडित मुलीवर हा अत्याचार केला आहे. या अत्याचारातून पीडित मुलगी आठ महिन्यांची गर्भवती राहिली आहे. हा प्रकार समजल्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी मंगळवारी संध्याकाळी अमरावतीच्या शिरखेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी रिद्धपूर मठाच्या मुनीविरोधात गुन्हा दाखल केला.
advertisement
पीडित मुलगी मागच्या वर्षभरापासून या मठामध्ये सेवेकरी म्हणून काम करत होती. मठामध्ये राहत असताना मुनीने मावशीकडे मुलीला पाठवं असं 2 एप्रिल 2024 ला सांगितलं. त्यानंतर पीडित मुलीच्या मावशीने तिला सुरेंद्रमुनी तळेगावकरच्या खोलीमध्ये पाठवलं, जिकडे मुनीने आपल्यावर अत्याचार केले, असं मुलीने सांगितलं आहे. मठामध्ये राहणाऱ्या बाळासाहेब देसाई या 40 वर्षांच्या व्यक्तीने देखील आपल्यावर अत्याचार केल्याचं पीडित मुलीने जबाबात म्हणलं आहे. दोन्ही आरोपींनी आपल्यावर अनेक महिने अत्याचार केले. मी मावशीला याबाबत सांगितलं, पण तिने मला धमकावलं आणि गप्प बसवलं, असं पीडित तरुणी म्हणाली. या प्रकरणाचा सखोल तपास केला असता पीडितेच्या सख्खा मामाने देखील मुलीवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या मावशीसह चौघांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Feb 23, 2025 9:07 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
अमरावती: मठात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, पीडितेच्या फोनमध्ये आढळले आक्षेपार्ह Video









