advertisement

सिगारेटच्या पैशावरून वाद, एकाचं डोकं फिरलं, थेट वाहन चालकालाच पेटलवलं, मुंबईत...

Last Updated:

Mumbai News: दोघांच्या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा उलटा परिणाम झाला आणि वाद आणखी चिघळला.

Mumbai News: सिगारेटच्या पैशावरून वाद, एकाचं डोकं फिरलं, थेट वाहन चालकालाच पेटलवलं, मुंबईत... (Ai Photo)
Mumbai News: सिगारेटच्या पैशावरून वाद, एकाचं डोकं फिरलं, थेट वाहन चालकालाच पेटलवलं, मुंबईत... (Ai Photo)
मुंबई: हल्ली लहान वाददेखील गंभीर आणि भयंकर रूप घेऊ शकतात. याचं उदाहरण जोगेश्वरीत पाहायला मिळालं. फक्त सिगारेटच्या पैशावरून सुरू झालेला वाद एवढा उग्र झाला की एका व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण झाला. दोन मित्रांमध्ये सुरू झालेल्या भांडणात तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे प्रकरण इतकं गंभीर बनलं की त्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
जोगेश्वरीत राहणारे वाहन चालक राजेंद्र जयराम यादव (44) यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. रात्री सुमारे 10 वाजता राजेंद्र घरी परतत असताना, त्यांचा पुतण्या पंकज यादव (22) यांच्यासोबत सिगारेटच्या पैशावरून वाद सुरू झाला. वाद चिघळत असताना, नागेंद्र यादव (22) हा परिसरातील रहिवासी घटनास्थळी आला. यावेळी नागेंद्र धुंद अवस्थेत असल्याने त्यांच्या हालचालींवर नियंत्रण नव्हतं. त्यांनी दोघांच्या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा उलटा परिणाम झाला आणि वाद आणखी चिघळला.
advertisement
वाद अधिक उग्र झाल्यानंतर, नागेंद्र यादवने राजेंद्र यादवच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली. यामुळे राजेंद्र गंभीर जखमी झाले. पंकज यादव ही घटना पाहून त्वरित पळून गेले आणि स्वतःला सुरक्षित केले. उपस्थित नागरिकांनी आग तातडीने विझवली. जखमी राजेंद्र यादव यांना शेजारी राहणाऱ्या मनोज यादव यांनी तातडीने दुचाकीवरून ट्रॉमा केअर येथे नेले. तिथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मल्लिका हॉस्पिटल, जोगेश्वरी पश्चिम येथे दाखल केले गेले. डॉक्टरांनी त्यांना गंभीर जखमी म्हणून उपचार सुरू केले आहेत.
advertisement
दरम्यान, अंबोली पोलिसांनी नागेंद्र यादवविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपीच्या शोधासाठी तपास सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळाची सखोल चौकशी करत असून, नागरिकांना अशा प्रकारच्या वादांमध्ये हस्तक्षेप करताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
सिगारेटच्या पैशावरून वाद, एकाचं डोकं फिरलं, थेट वाहन चालकालाच पेटलवलं, मुंबईत...
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement