प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, बलात्कार करुन सोडलं, नागपुरच्या टपरीवाल्याचं कांड ऐकून हादराल!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Nagpur: नागपूरच्या पांचपावली परिसरात एका तरुणाने कॉलेजच्या तरुणीवर लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केला आहे.
नागपूरच्या पांचपावली परिसरात एका तरुणाने कॉलेजच्या तरुणीवर लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केला आहे. आरोपी विवाहित असूनही त्याने पीडितेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपीनं आपलं नाव बदलून पीडितेला आपल्या जाळ्यात ओढळलं, त्यानंतर तिला स्वत:च्या घरी आणि लॉजवर घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला. पण त्यांचं हे बिंग फुटल्यानंतर पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे.
साहील उर्फ अब्दुल शरीक कुरेशी अब्दुल कुरेशी असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. त्याचा विवाह झाला असून त्याला मुलं देखील आहेत. तो नागपुरच्या चारखंभा चौकात पानटपरी चालवतो. असं असूनही त्याने एका १९ वर्षीय कॉलेजच्या तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. तिला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. आरोपीनं एका ट्यूशन समोर तिच्याशी ओळख केली होती. यानेळी त्याने आपलं नाव साहिल शर्मा असल्याचं पीडितेला सांगितलं होतं.
advertisement
अत्याचार केल्यनंतर काही दिवसांनी आरोपीनं आपला पीडित तरुणीला टाळायला सुरुवात केली. शिवाय आपला फोनही बंद ठेवला. यामुळे पीडित तरुणीने आरोपीचा फोटो दाखवत आसपासच्या परिसरात आरोपीचा शोध घेतला, यावेळी आरोपीचं नाव साहिल नसून अब्दुल असल्याचं समोर आलं. यानंतर पीडित तरुणी आरोपीच्या घरी गेली असता, आरोपीचा विवाह झाल्याचं तिला समजलं. यानंतर पीडितेनं थेट पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली.
advertisement
पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपीच्या पत्नीने देखील आरोपीविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोन्ही प्रकरणात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीनं यापूर्वीही अशाप्रकारे इतर तरुणींना फसवलं होतं का? याचा तपास पोलीस करत आहेत. एका विवाहित तरुणाने अशाप्रकारे कॉलेजच्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
March 31, 2025 11:07 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, बलात्कार करुन सोडलं, नागपुरच्या टपरीवाल्याचं कांड ऐकून हादराल!


