लहान लेकरांच्या भांडणात मोठी लोक भिडली, हाणामारी-गोळीबारापर्यंत झाला राडा, नेमकं झालं काय?

Last Updated:

Nashik Malegaon Crime : लहान मुलांच्या किरकोळ वादातून दोन गटांमध्ये तीव्र संघर्ष उफाळून आला आणि त्याने अक्षरशः हिंसाचाराचे रूप घेतले.

AI Image
AI Image
बब्बू शेख, प्रतिनिधी, मालेगाव : नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याचा दावा पोलिसांकडून केला जातो, मात्र प्रत्यक्षात गुन्हेगारीच्या घटना सुरूच आहेत. अशीच एक धक्कादायक घटना मालेगावच्या आयेशा नगर परिसरात घडली. लहान मुलांच्या किरकोळ वादातून दोन गटांमध्ये तीव्र संघर्ष उफाळून आला आणि त्याने अक्षरशः हिंसाचाराचे रूप घेतले.
लहान मुलांच्या भांडणातून मोठा राडा झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रथम दोन्ही गटांनी हातात तलवारी, लाठ्या आणि काठ्या घेत एकमेकांवर हल्ला चढवला. रस्त्यावर वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर अचानक एका गटातील व्यक्तीने गावठी पिस्तूल काढून थेट गोळीबार केला. सुदैवाने गोळी झाडण्यात आलेल्या व्यक्तीचा थोडक्यात जीव वाचला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून मेहताब अली या आरोपीला अटक केली आहे. तर इतर आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे मालेगावमधील कायदा-सुव्यवस्था आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लहान मुलांच्या भांडणातून एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की, सर्व आरोपींना लवकरच गजाआड केले जाईल आणि परिसरात पुन्हा शांती प्रस्थापित केली जाईल.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
लहान लेकरांच्या भांडणात मोठी लोक भिडली, हाणामारी-गोळीबारापर्यंत झाला राडा, नेमकं झालं काय?
Next Article
advertisement
BMC Election : मुंबईत मोठी घडामोड, दोन वॉर्डमधून महायुती 'आऊट', बीएमसी निवडणुकीत मोठा उलटफेर
मुंबईत मोठी घडामोड, दोन वॉर्डमधून महायुती 'आऊट', बीएमसी निवडणुकीत मोठा उलटफेर
  • आता अनेक प्रभागांतील लढतींचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे.

  • मात्र, मतदानापूर्वीच महायुतीला दोन जागांवर मोठा धक्का बसला आहे.

  • दोन जागांवर महायुतीचे उमेदवार नाहीच.

View All
advertisement