अख्खं अमेरिका pablo escobar ला घाबरायचं, पण हा गडी एका महिलेला पाहून पळायचा दूर, कोण आहे ती लेडी डॉन?

Last Updated:

कोलंबियातला पाब्लो एस्कोबार हा एकेकाळी खूप मोठा ड्रग माफिया मानला जात होता, मात्र त्यालाही अमेरिकेतल्या एका महिलेची भीती वाटायची.

(पाब्लो एस्कोबार)
(पाब्लो एस्कोबार)
नवी दिल्ली : कोलंबिया आणि अमेरिकेत अनेक मोठे ड्रग माफिया होऊन गेले. कोलंबियातला पाब्लो एस्कोबार हा एकेकाळी खूप मोठा ड्रग माफिया मानला जात होता, मात्र त्यालाही अमेरिकेतल्या एका महिलेची भीती वाटायची. स्वतःच्या 3 नवऱ्यांची हत्या केलेली ही महिलादेखील खूप मोठी ड्रग माफिया होती. कोण होती ती महिला ड्रग माफिया?
ड्रग्ज, गांजा. दारू, चरस याची अनेक रॅकेट्स पकडल्याचं आज आपण ऐकतो. देशात सध्या अशा अनेक टोळ्या सक्रिय आहेत, मात्र परदेशात याची सुरुवात कित्येक दशकांपूर्वीच झालीय. त्या काळात परदेशात अनेक ड्रग माफिया होऊन गेले. त्यात एक महिला ड्रग माफियाही होती. तिच्या नावाचा दबदबा होता. एकेकाळचा मोठा ड्रग माफिया पाब्लो एस्कोबारही तिला घाबरायचा अशी ती महिला कोण होती? अंडरवर्ल्डमध्ये तिची ‘ब्लॅक विडो’ अशी ओळख होती. तिचं नाव होतं, ग्रिसेल्डा ब्लँको रेस्ट्रेपो.
advertisement
तिचा जन्म कार्टाजेना इथं झाला. ती तीन वर्षांची असताना आई अ‍ॅना रेस्ट्रेपोसह मेडलीनला गेली. वयाच्या 11 वर्षी तिनं शेजारच्या एका मुलाचं अपहरण केलं होतं व त्याला बंदुकीची गोळी घालून मारलं. तेराव्या वर्षी ती खिसेकापू बनली. एकोणिसाव्या वर्षी ती घरातून पळून गेली व वर्षभर चोरी करत होती. त्यानंतर ती अमेरिकेत मियामीला गेली. तिथे कोकेन गॉडमदर अशी तिची ओळख प्रस्थापित झाली.
advertisement
ग्रिसेल्डा कोलंबियाची ड्रग लॉर्ड होती. कोकेनची तस्करी आणि विक्री ती करायची. कोलंबियापासून मियामीपर्यंत तिचं नेटवर्क पसरलं होतं. 1970 च्या दशकापासून ते 2000च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत तिच्या नावाचा दरारा होता. महिन्याला 8 कोटी डॉलरची कमाई ती करत होती.
ग्रिसेल्डा आणि तिचा पहिला नवरा कार्लोस ट्रुजिलोनं कोलंबियामध्ये मारिजुआना डीलिंगचा व्यवसाय सुरू केला होता. 1964 मध्ये बनावट कागदपत्रांच्या मदतीने ती अमेरिकेत आली. तिची तीन मुलं आणि दुसरा नवरा अल्बर्टो ब्रोव्हो याच्यासह ती न्यूयॉर्कमध्ये राहिली. तो मेडलीन कार्टेलसाठी कोकेनची तस्करी करायचा. दोघांनी मिळून अमेरिकेत ड्रग तस्करीचं मोठं रॅकेट उभारलं. एप्रिल 1975 मधअये ग्रिसेल्डा हिला 30 साथीदारांसह ड्रग तस्करीच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलं. त्यामुळे ती कोलंबियात पळून गेली. सत्तरच्या दशकाच्या शेवटी पुन्हा अमेरिकेत आली. मियामीमध्ये तिनं स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
advertisement
ब्लँकोनं मियामीमध्ये व्यवसायात जम बसवण्याकरता शस्त्रांची मदत घेतली. तिच्या वाटेत येणाऱ्या गँगला तिनं मारलं. त्यामुळेच 80 च्या दशकात मियामीमध्ये दरवर्षी अनेक हत्या झाल्या. त्याला मियामी ड्रग वॉर म्हणून ओळखलं जातं. तेव्हा गांजापेक्षा कोकेनची तस्करी जास्त केली जायची. ब्लँको हिला 17 फेब्रुवारी 1985 ला घरातूनच अटक करण्यात आली. तिला 15 वर्षांची कैद सुनावण्यात आली. दरम्यानच्या काळात तिच्यावर फ्लोरिडाकडून फर्स्ट डिग्री मर्डरच्या तीन प्रकरणांचा आरोप ठेवण्यात आला. ब्लँकोला 1998 मध्ये सेकंड डिग्री मर्डरच्या तीन प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आलं आणि 20 वर्षांच्या कैदेची शिक्षा झाली. ब्लँकोला लहान वयातच सिगरेटचं व्यसन लागलं होतं. त्यामुळेच 2002 मध्ये तिला तुरुंगात हार्ट अटॅक आला. 2004 मध्ये आजारपणाच्या कारणामुळे तिची तुरुंगातून सुटका झाली व मेडलीनला तिला पाठवण्यात आलं.
advertisement
ब्लँकोनं व्यावसायिक मतभेदांवरून पहिल्या नवऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली होती. दुसऱ्या नवऱ्यावर लाखो डॉलर चोरल्याचा आरोप करून त्याचीही तिनं हत्या केली. तिसरा नवरा डारियो सिपुलेवेडा व ब्लँको यांना मायकल नावाचा एक मुलगा झाला. 1983 मध्ये सिपुलेवेडा ब्लँकोला सोडून कोलंबियाला परत गेला व त्यानं मायकलचं अपहरण केलं. त्यामुळे ब्लँकोनं सिपुलेवेडाची हत्या केली. त्यानंतर मायकल तिच्याकडे राहू लागला. मियामी न्यू टाइम्सच्या एका वृत्तानुसार, मायकल मोठा होण्याआधीच त्याचे वडील व भावंडांची हत्या करण्यात आली होती. त्याची आई त्याच्या किशोरावस्थेत जेलमध्ये होती. त्याचा सांभाळ त्याच्या आजीनं केला.
advertisement
ग्रिसेल्डा ब्लँको हिची हत्या मेडलीनमध्ये करण्यात आली. 3 सप्टेंबर 2012 मध्ये ब्लँको तिच्या गरोदर सुनेसोबत कोपऱ्यावरच्या दुकानात गेली होती. दुकानातून बाहेर पडत असताना मोटारसायकलवरून आलेल्या व्यक्तीने तिच्यावर बंदुकीच्या दोन गोळ्या झाडल्या. त्यात तिचा मृत्यू झाला. अमेरिका, कोलंबिया भागात सत्तरच्या दशकापासून ड्रग्ज तस्करीच्या मोठ्या रॅकेट चालवणाऱ्या ब्लँकोचा अशा प्रकारे अंत झाला. भारतातही वाढत असलेल्या ड्रगच्या वापरामुळे टोळीयुद्धही पुन्हा सुरू होत आहेत असा पोलिसांचा अंदाज आहे. पण ते कठोर कारवाई करून गुन्हेगारी नियंत्रणात ठेवतात.
मराठी बातम्या/क्राइम/
अख्खं अमेरिका pablo escobar ला घाबरायचं, पण हा गडी एका महिलेला पाहून पळायचा दूर, कोण आहे ती लेडी डॉन?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement