Ranjeet Kasale Video : झुकेगा नही बोलत तुरुंगात गेला, रणजीत कासलेच्या मुसक्या का आवळल्या? सूरत पोलिसांनी दाखवला VIDEO, कारनामे पाहून हैराण व्हाल!

Last Updated:

Ranjeet Kasale Video : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत आलेला बीडचा बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले आता चांगलाच अडचणीत सापडला आहे.

रणजित कासलेच्या मुसक्या का आवळल्या? सूरत पोलिसांनी व्हिडीओ दाखवला, कारनामे पाहाल तर हैराण व्हाल!
रणजित कासलेच्या मुसक्या का आवळल्या? सूरत पोलिसांनी व्हिडीओ दाखवला, कारनामे पाहाल तर हैराण व्हाल!
लातूर: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत आलेला बीडचा बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले आता चांगलाच अडचणीत सापडला आहे. काही दिवसांपूर्वीच रणजित कासले याला सूरत पोलिसांनी लातूरमधून अटक केलं होतं. त्यावेळी रणजित कासले याने खास पुष्पा स्टाइलमध्ये झुकेगा नही साला म्हणत बॉसला अटक केली जात असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता सूरत पोलिसांनी त्याच्या कारनाम्याचा व्हिडीओ समोर आणला आहे.
advertisement
वादग्रस्त आणि बडतर्फ पोलीस अधिकारी म्हणून ओळखला जाणारा रणजीत कासले पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘झुकेगा नहीं साला’ अशी शैली दाखवणाऱ्या या अधिकाऱ्यावर आता मोबाईल चोरी आणि पैशांची जबरदस्ती लुट केल्याचा गंभीर आरोप सिद्ध होत असल्याचे समोर आले आहे. सुरत पोलिसांनी त्याचा व्हिडिओ सार्वजनिक करत ही संपूर्ण घटना उघड केली.
advertisement
काही दिवसांपूर्वी रणजीत कासले दुचाकीने सुरत येथे पोहोचला होता. तपासाच्या नावाखाली त्याने दोन जणांना धाक दाखवून त्यांच्याकडील दोन मोबाईल आणि दोन लाखांहून अधिक रक्कम हिसकावून घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून आले. पीडित व्यक्तींनी सुरत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर तपास सुरू सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले.
advertisement
या प्रकरणात तातडीने कारवाई करत गुजरात पोलिसांनी 20 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री लातूर येथून रणजीत कासलेला ताब्यात घेतले. अटकेनंतर गाडीत बसताना त्याने चित्रपट ‘पुष्पा’ची अ‍ॅक्शन कॉपी करत 'बॉस पकडला गेला' अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र सुरत पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर त्याने हात जोडत गुन्हा कबूल केला आणि माफी मागितल्याचाही व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
advertisement
advertisement
गुजरात राज्यातील सुरत आणि आजूबाजूच्या परिसरात झालेल्या जबरी घरफोडी प्रकरणी अटक असलेल्या आरोपींकडून रणजीत कासले यांच्याबाबत माहिती मिळाली. या आरोपींना मदत करणे किंवा इतर सहकार्य पुरवणे अशा स्वरूपाचा संशय गुजरात पोलिसांना असल्याकारणाने त्यांनी दोन दिवसा लातूर शहरात रणजीत कासले यास अटक करण्यासाठी शोध मोहीम सुरू केली होती.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Ranjeet Kasale Video : झुकेगा नही बोलत तुरुंगात गेला, रणजीत कासलेच्या मुसक्या का आवळल्या? सूरत पोलिसांनी दाखवला VIDEO, कारनामे पाहून हैराण व्हाल!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement