Shraddha Walkar : 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले; वर्ष उलटूनही श्रद्धा हत्याकांडाचे अनेक प्रश्न अनुत्तरीत
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
आफताबने २० मे रोजी ३०० लीटरचा फ्रीज खरेदी केला आणि त्यात श्रद्धाचा मृतदेह ठेवला. यानंतरही मृतदेह कुजतच होता आणि त्याचा दुर्गंधी पसरत चालली होती.
दिल्ली, 12 डिसेंबर : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाला एक वर्ष कालावधी लोटला आहे. पण आजही हे हत्याकांड एक गूढ बनून राहिलीय. खून करणाऱ्याने गुन्हा कबूल केला असला तरी पोलिसांकडे असलेले पुरावेही अर्धे आहेत. त्यामुळे गुन्ह्याच्या सर्व घटना जुळत नाहीयेत. त्यामुळे काही प्रश्न अनुत्तरीत आहेत. इतकं प्रेम करणारा व्यक्ती एखाद्याबाबत एवढा क्रूर कसा बनू शकतो असा प्रश्न आहे.
मुंबईतून बेपत्ता झालेली श्रद्धा दिल्लीत राहत होती. गेल्या वर्षी १८ मे रोजी तिची हत्या झाली होती. तिच्या मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले होते. या प्रकरणाचा खुलासा ८ महिन्यांनी नोव्हेंरमध्ये झाला. पोलिसांनी श्रद्धाच्या खून प्रकरणी तिचा लिव्ह इन पार्टनर आफताबला अटकही केली. पोलीस चौकशीत त्याने हत्याकांडाची पूर्ण क्राइम स्टोरी सांगितली. मात्र पुरावा कोणत्याच गोष्टीचा दिला नाही. पोलिसांनी त्याची पॉलिग्राफी आणि नार्को टेस्टही केली. यानंतरही पुराव्याअभावी काही प्रश्न असे आहेत ज्यांची उत्तरे मिळालेली नाहीत.
advertisement
श्रद्धा स्वतंत्र विचारांची होती. तिच्या वडिलांसोबत ती पालघरमध्ये रहायची. २०१८ मध्ये श्रद्धाने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका ठिकाणी नोकरी सुरू केली. ऑनलाइन डेटिंग एप बंबलच्या माध्यमातून ती मुंबईत राहणाऱ्या आफताब पूनावालाच्या संपर्कात आली. दोघे प्रेमात पडले पण श्रद्धाच्या कुटुंबियांना आफताब आवडत नव्हता. त्यामुळे श्रद्धाने घर सोडलं आणि हॉस्टेलला रहायला लागली. फेब्रुवारी २०२२ दोघांमध्ये सगळं व्यवस्थित होतं. मात्र, श्रद्धाने आफताबला लग्नाबाबत विचारलं तेव्हा तो तिला टाळू लागला. तिच्यापासून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात होता.
advertisement
आफताबने एप्रिल-मे २०२२ मध्ये उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश फिरण्याचा प्लॅन केला. त्याठिकाणी खोल दरीत ढकलून देण्याचा प्लॅन होता.पण हे शक्य झालं नाही. मुंबईला परतण्याऐवजी तिथून आफताब दिल्लाला गेला. १३ मे रोजी महरौलीत १ बीएचके फ्लॅट भाड्याने घेतला. १८ मे २०२२ रोजी श्रद्धाचा त्याने गळा दाबून हत्या केली. पोलीस चौकशीत त्याने २ दिवस मृतदेह फ्लॅटमध्ये ठेवल्याचं सांगितलं.
advertisement
मृतदेह कुजायला लागल्यानंतर आफताबने २० मे रोजी ३०० लीटरचा फ्रीज खरेदी केला आणि त्यात मृतदेह ठेवला. यानंतरही मृतदेह कुजतच होता आणि त्याचा दुर्गंधी पसरत चालली होती. शेवटी आफताबने ३५ तुकडे करून पॉलिथीनच्या बॅगमध्ये पॅक केले. त्या बॅग तो आजूबाजूच्या जंगलात फेकत होता.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने श्रद्धाच्या पालकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याने ९ जून २०२२ पर्यंत श्रद्धाचे इन्स्टाग्राम अकाउंटही चालू ठेवले आणि तिच्या अकाउंटवरून चॅटही करत होता. ऑगस्ट २०२२ मध्ये श्रद्धाच्या एका मित्राला शंका आली आणि त्याने श्रद्धाचा भाऊ आणि वडिलांना बोलून काहीतरी वाईट घडल्याची शंका व्यक्त केली. यानंतर श्रद्धाच्या वडिलांनी ऑगस्ट २०२२ मध्ये मुंबईतील मानिकपूर पोलिसात तक्रार दाखल केली. श्रद्धाच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन दिल्लीत आढळलं होतं. तिच्या वडिलांनी दिल्ली गाठली आणि महारौली पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर दिल्ली पोलिसांनी संशयाच्या आधारावर आफताबला ताब्यात घेत चौकशी सुरु केली आणि सगळा खुलासा झाला.
advertisement
पोलिस चौकशीत आफताबने जी माहिती सांगितली त्याने सर्वांनाच धक्का बसला. श्रद्धाच्या हत्येनंतर तो घाबरला होता पण डोक्यात पुढचा प्लॅन आला. मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर एक-दोन तुकडे बॅगमध्ये घालून ते १८ दिवसात आजूबाजूला जंगलात फेकून दिले. त्याला ही कल्पना इंटरनेटवरून सुचली होती. पोलिसांनी सांगितलं की, आफताबने श्रद्धाचं डोकं कापून फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आपल्या दिवसाची सुरुवात श्रद्धाचा चेहरा पाहूनच तो करायचा. पण जेव्हा डोकंही कुजायला लागलं तेव्हा त्याने ते जंगलात फेकून दिलं. दोन महिने शोध घेतल्यानंतर पोलिसांना फक्त २२ तुकडे सापडले होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 12, 2023 12:56 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Shraddha Walkar : 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले; वर्ष उलटूनही श्रद्धा हत्याकांडाचे अनेक प्रश्न अनुत्तरीत









