crime : 17 वर्षांच्या मुलाच्या आईने हद्द केली पार, लेकाला लाज वाटली म्हणून तो नडला, पण...

Last Updated:

आरोपीने क्रिशच्या डोक्यात दगडाने घाव घातले. त्यानंतर मृतदेह गंगाकिनारी फेकून देऊन तो फरार झाला.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र
हरिद्वार : हरिद्वारमध्ये एका अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. एका व्यक्तीचे त्या मुलाच्या आईशी अनैतिक संबंध होते. त्या संबंधांना या मुलाचा विरोध होता. त्यामुळे त्याची कट रचून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे.
हरिद्वारमधल्या कनखल पोलीस स्टेशनच्या हद्दीत 17 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. हरिद्वार पोलिसांनी हत्येप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे या अल्पवयीन मुलाच्या आईशी अनैतिक संबंध होते; पण या मुलाचा त्याला विरोध असल्याने कट रचून त्याची हत्या करण्यात आली. आरोपी या मुलाचा मोठा भाऊ आहे. बुधवारी (3 जानेवारी) एसएसपी प्रमेंद्र सिंह डोबाल यांनी मायापूरमधल्या एसपी शहर कार्यालयात या प्रकरणाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, `एक जानेवारीला दुपारी बैरागी कॅम्पजवळ गंगा नदीकिनारी यश उर्फ क्रिशचा मृतदेह सापडला. त्याच्या डोक्यावर गंभीर जखम होती. मृतदेह पोस्टमॉर्टेमला पाठवल्यानंतर प्रकरणाबाबत लोकांकडे चौकशी सुरू केली. तपासादरम्यान, मृत क्रिशच्या ओळखीच्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. त्या वेळी त्याने क्रिशच्या आईशी त्याचे अनैतिक संबंध होते आणि त्याला क्रिशचा विरोध होता, असं कबूल केलं. विशेष म्हणजे, आरोपीने पोलिसांना घटनेची माहिती स्वतःच दिली होती. तसंच त्याने क्रिशचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना मदत केली होती.`
advertisement
या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित कटारिया हा क्रिशचा मोठा भाऊ असून, त्याचे त्याच्या चुलतीशी अनैतिक संबंध होते. त्याला क्रिशचा विरोध होता. त्यामुळे 31 डिसेंबर रोजी रात्री तो त्याला शॉपिंगच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला. त्यानंतर त्याला दारू पाजली आणि कनखल बैरागी कॅम्प परिसरात नेऊन गळा दाबून त्याची हत्या केली. या प्रकरणी आरोपी अमित कटारियाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं एसपींनी सांगितलं.
advertisement
आरोपीने क्रिशच्या डोक्यात दगडाने घाव घातले. त्यानंतर मृतदेह गंगाकिनारी फेकून देऊन तो फरार झाला. दुसऱ्या दिवशी आरोपीनं स्वतः गंगाकिनाऱ्यावरून मृतदेह ताब्यात घेऊन कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. स्वतःवर हत्येवर संशय येऊ नये म्हणून अमितने हे कृत्य केलं. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
मराठी बातम्या/क्राइम/
crime : 17 वर्षांच्या मुलाच्या आईने हद्द केली पार, लेकाला लाज वाटली म्हणून तो नडला, पण...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement