'5 लोकांच्या त्रासाला कंटाळलोय!' व्हिडीओ अन् लोकेशन पाठवून तरुणाने केली आत्महत्या, 2 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील 25 वर्षीय नवविवाहित अमर लहू मुळे याने वांगी गायरान झुडपामध्ये आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने आत्याच्या मुलाला...
मार्डी (सोलापूर) : नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील एका नवविवाहित युवकाने उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी गायरान झुडपामध्ये आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या आत्याच्या मुलाच्या मोबाईलवर आत्महत्येचा व्हिडीओ आणि सध्याचे लोकेशन पाठवले होते, ज्यामुळे या घटनेमागील धक्कादायक सत्य समोर आले आहे. अमर लहू मुळे (वय-25, रा. नान्नज) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
'पाच लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करतोय...'
सविस्तर माहिती अशी की, अमरने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ बनवला होता. त्यात त्याने म्हटले होते, "मी पाच लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे." हा व्हिडीओ त्याने आपल्या आत्याच्या मुलाच्या मोबाईलवर पाठवला आणि सोबत आत्महत्येचे ठिकाण (लोकेशन) देखील पाठवले. या व्हिडीओमध्ये त्याने आपल्या कुटुंबीयांना विनंती केली होती की, "खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभे राहा. माझ्या मोबाईलमध्ये यासंबंधीचे फोटो आणि रेकॉर्डिंग आहे." या व्हिडीओसोबत त्याने आपल्या मोबाईलचा पासवर्डही सांगितला होता.
advertisement
रात्रभर शोध, सकाळी आढळला मृतदेह
अमरने व्हिडीओ पाठवल्यानंतर त्याचे वडील, चुलते, चुलतभाऊ आणि नातेवाईक यांनी रात्रभर त्याचा शोध घेतला. मात्र, रात्री त्याचा मृतदेह सापडला नाही. रविवारी सकाळी पुन्हा शोधाशोध सुरू केली असता, अमरचा मृतदेह कडुलिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेची माहिती पोलीस पाटील योगिता पवार यांनी तात्काळ तालुका पोलिसांना कळवली.
advertisement
अमर हा वाहनचालक म्हणून एका खासगी कंपनीत काम करत होता. त्याचा अवघ्या दोन महिन्यांपूर्वी, म्हणजे 6 जून रोजी पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथील मुलीशी विवाह झाला होता. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांत अमरने आत्महत्या केल्यामुळे नान्नज आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आता या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, अमरला त्रास देणारे ते पाच लोक कोण होते, याचा शोध घेतला जात आहे.
advertisement
हे ही वाचा : Amravati News: नवऱ्याचं बाहेर लफडं, तरीही 'ती'ला दमदाटी; म्हणे, "चुपचाप संसार कर, नाहीतर..."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 04, 2025 1:58 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
'5 लोकांच्या त्रासाला कंटाळलोय!' व्हिडीओ अन् लोकेशन पाठवून तरुणाने केली आत्महत्या, 2 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न!








