आत्याला धोका, मामाशी लफडं, सोनमपेक्षा डेंजर निघाली औरंगाबादची गुंजा, पतीला दिला भयंकर मृत्यू
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Aurangabad: राजा रघुवंशी हत्याकांडाची घटना ताजी असता आता औरंगाबादमध्ये या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.
मध्य प्रदेशच्या इंदूर येथील रहिवासी असणाऱ्या सोनम रघुवंशीने हनिमूनला गेल्यानंतर आपला पती राजा रघुवंशीची निर्घृण हत्या केली होती. सोनमने आपला प्रियकर राज कुशवाह आणि त्याच्या तीन साथीदारांशी संगनमत करत पतीची हत्या केली होती. तिने मेघालयातील शिलाँगला हनिमूनला जात हे हत्याकांड घडवलं होतं. हत्येची ही घटना ताजी असता आता महाराष्ट्रातील संभाजीनगरात या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.
एका महिलेनं लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात आपल्या पतीची निर्घृण हत्या केली आहे. महिलेनं मामासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून हे भयंकर पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी महिला गुंजाला अटक केली आहे. पोलिसांनी तिला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी संभाजीनगरच्या नबीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बारवान गावातील रहिवासी प्रियांशू कुमार सिंग ऊर्फ छोटू याची हत्या झाली होती. ही हत्या कुणी आणि का केली? याचा कसलाही पुरावा पोलिसांकडे नव्हता. पण पोलिसांनी या प्रकरणात खोलात जाऊन तपास केला असता, पत्नीनेच ही हत्या केल्याचं समोर आलं. ज्यावेळी पोलिसांनी आरोपी पत्नी गुंजाला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा तिने उडवाउडवीची उत्तरं दिली. तिच्यावर संशय आल्यानंतर पोलिसांनी तिला पोलिसी खाक्या दाखवल्या. यानंतर तिने हत्येची कबुली दिली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी प्रियांशूची पत्नी गुंजा देवीसह तीन आरोपींना अटक केली आहे.
advertisement
गुंजाने पोलिसांना सांगितलं आहे की, लग्नापूर्वी तिचे पंधरा वर्षे तिच्या आत्याचा नवरा जीवन सिंगसोबत प्रेमसंबंध होते. तिने आपल्या आत्याला धोका देत मामासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. दीड महिन्यांपूर्वी तिचा विवाह प्रियांशू सोबत झाला होता. पण या लग्नामुळे गुंजा खूश नव्हती. लग्नानंतर प्रियांशुला आयुष्यातून काढून टाकण्यासाठी तिने जीवन सिंगबरोबर मिळून प्रियांशूच्या हत्येचा कट रचला. जीवनसिंगने शूटरला सुपारी देऊन प्रियांशूची हत्या घडवून आणली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Location :
Aurangabad,Aurangabad,Bihar
First Published :
July 04, 2025 8:01 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
आत्याला धोका, मामाशी लफडं, सोनमपेक्षा डेंजर निघाली औरंगाबादची गुंजा, पतीला दिला भयंकर मृत्यू