'सोडू नका, ठार मारा', पतीचा खून करायचा होता, पण बॉयफ्रेंडचा जीव गेला, अनैतिक संबंधातून घडला भयंकर कांड!

Last Updated:

Crime in Extra Marital Affair: अनैतिक प्रेमसंबंधाचं एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेनं अनैतिक प्रेम संबंधातून आपल्या पतीची हत्या करण्याचा प्लॅन रचला होता. पण या सगळ्या कटात बॉयफ्रेंडचा मृत्यू झाला आहे.

News18
News18
अनैतिक प्रेमसंबंधाचं एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेनं अनैतिक प्रेम संबंधातून आपल्या पतीची हत्या करण्याचा प्लॅन रचला होता. ही हत्या करण्यासाठी तिने आपल्या बॉयफ्रेंडसह त्याच्या मित्राची मदत घेतली होती. ठरल्याप्रमाणे तिघांनी मिळून पतीची हत्या करण्याचाही प्रयत्न केला. मात्र पतीच्या प्रसंगावधानामुळे या तिघांचा प्लॅन फसला आणि या प्रकरणाला चक्रावून टाकणारं वळण मिळलं. पतीची हत्या करायची होती, पण महिलेचा बॉयफ्रेंडच मृतावस्थेत आढळला आहे. अनैतिक संबंधातून घडलेला हा प्रकार पाहून पोलीस देखील हादरून गेले आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्याच्या इंडी डाऊन इथं घडली आहे. इथं बीरप्पा पुजारी नावाचा एक व्यक्ती आपली पत्नी सुनंदा आणि आपल्या दोन मुलांसह राहतो. ३१ ऑगस्टच्या रात्रीपर्यंत बीरप्पाच्या घरात सर्व काही सुरळीत सुरू होतं. हे कुटुंब सुखाने जगत होतं. पण ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरच्या रात्री असं काही घडल, ज्यामुळे बीरप्पाचं सगळं आयुष्यचं बदलून गेलं.
advertisement
३१ ऑगस्टच्या रात्री बीरप्पा रात्री जेवण करून आपल्या कुटुंबासोबत झोपी गेला होता. रात्री दोनच्या सुमारास त्याच्या घरात दोघेजण शिरले होते. त्यांनी अचानक बीरप्पाचा गळा आवळायला सुरुवात केली. झोपेत असणाऱ्या बीरप्पाला सुरुवातीला काहीच समजलं नाही, नेमकं काय सुरू आहे. पण त्याने बाजूला पाहिला तर त्याची पत्नी सुनंदा ही मारेकऱ्यांना उकसवत होती. बीरप्पाला जीवंत सोडू नका, त्याला ठार करा, असं ती म्हणत होती.
advertisement
हा सगळा प्रकार पाहून बीरप्पाने जीव एकवटून हल्लेखोराच्या तावडीतून सुटका केली आणि मदतीसाठी आरडाओरड केली. बीरप्पाचा आवाज ऐकून शेजारी आणि घरमालक बीरप्पाच्या घरी आले. शेजाऱ्यांना येत असल्याचं पाहून मध्यरात्री घरात घुसलेले दोघेही घरातून पळून गेले. या हल्ल्यात बीरप्पा जखमी झाले. पण त्यांचा जीव वाचला. या घटनेची माहिती जेव्हा पोलिसांना मिळाली, तेव्हा भलताच कांड समोर आला. हल्ला करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नव्हे तर सुनंदाचा बॉयफ्रेंड असल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत सुनंदाला अटकही केली.
advertisement
पण या घटनेनंतर दहा दिवसांनी सुनंदाचा बॉयफ्रेंड सिद्धप्पा हा मृतावस्थेत आढळला आहे. त्याने गावाजवळील जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. सुनंदाला अटक झाल्यानंतर तिने हा सगळा गुन्हा सिद्धप्पा यानेच केल्याचा बनाव रचला. तसेच आपला प्रकरणाशी काहीही संबंध नाही, हे सांगण्याचा प्रयत्न केला. यामुळे सिद्धप्पा व्यथित झाला. अशा स्थितीत पोलिसांनी आपल्याला पकडलं तर आपण कायमचं अडकू, अशी भीती सिद्धप्पाला होती. त्यामुळे त्याने एक व्हिडीओ जारी केला. यात त्याने सुनंदा आणि आपल्यात प्रेमसंबंध होते. यातूनच हे कांड घडलं. शिवाय या सगळ्या प्रकरणात आपण अडकू असं म्हटलं. यानंतर सिद्धप्पा एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. आता सिद्धप्पाने आत्महत्या केली की त्याची हत्या करून त्याला लटकवण्यात आलं. याचा तपास पोलीस करत आहेत. पण अनैतिक संबंधातून घडलेला हा प्रकार पाहून पोलीस चक्रावले आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
'सोडू नका, ठार मारा', पतीचा खून करायचा होता, पण बॉयफ्रेंडचा जीव गेला, अनैतिक संबंधातून घडला भयंकर कांड!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement