Aai Kuthe Kay Karte : अरुंधती होणार रिटायर्ड, नव्या आईची जॉइनिंग! मराठी TV वर नवा ड्रामा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
aai kuthe kay karte off air : प्रत्येकाला कुठे ना कुठे थांबावं लागतं. आयुष्यात नोकरी करत असाल तर रिटायरमेंट घ्यावीच लागते. अरुंधती देखील आता रिटायर्ड होणार आहे. पण घाबरू नका अरुंधती जरी रिटायर्ड होणार असली तरी नव्या आईची जॉइनिंग घेणार आहे.
मुंबई : आई कुठे काय करते या मालिकेच्या माध्यमातून अरुंधती महाराष्ट्राची लाडकी आई बनली. मालिकेच्या नावापासून ते मालिकेच्या शीर्षक गीतापासून ते मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांपर्यंत सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांना भावल्या. मालिकेतील कथा आणि मालिकेचे नाव प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी वेळोवेळी यशस्वी ठरली. अरुंधतीने मालिकेत देशमुखांच्या घरात सगळ्यांची काळजी घेण्याबरोबर महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचंही मनोरंजन केलं. पण प्रत्येकाला कुठे ना कुठे थांबावं लागतं. आयुष्यात नोकरी करत असाल तर रिटायरमेंट घ्यावीच लागते. अरुंधती देखील आता रिटायर्ड होणार आहे. पण घाबरू नका अरुंधती जरी रिटायर्ड होणार असली तरी नव्या आईची जॉइनिंग घेणार आहे.
आई कुठे काय करते ही मालिका 2019 पासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. आज या मालिकेला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. मालिका नेहमीच TRPच्या शर्यतीत नंबर वन ठरली आहे. मालिकेच्या कथेने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेतील सगळी पात्र प्रेक्षकांना आपलीशी वाटली. मालिकेत सुरुवातीला एकही खलनायक नव्हता. मानवी भावभावनांवर आधारित आई सारखा अगदी नाजूक विषय या मालिकेत मांडला गेला.
advertisement
तब्बल पाच वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर अरुंधतीच्या रिटायरमेंटची वेळ आली आहे. अरुंधती रिटायर्ड होणार आहे. आई कुठे काय करते मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अरुंधती जरी रिटायर्ड होत असली तरी तिच्या जागी नवी आई जॉइन होणार आहे.
advertisement
advertisement
असं म्हणतात की आई कधीच रिटायर्ड होत नाही त्यामुळे मराठी टेलिव्हिजनवर अरुंधतीची जागा घेण्यासाठी शुभा घेणार आहे. आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही नवी मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होत आहे. 2 डिसेंबरपासून ही मालिका दुपारी 2.30 प्रेक्षकांना पाहता येणार आहे. म्हणजेच आई कुठे काय करते ही मालिका 30 नोव्हेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 30 नोव्हेंबरला मालिकेचा शेवटचा एपिसोड टेलिकास्ट होणार आहे.
advertisement
advertisement
आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कुलकर्णी प्रमुख भूमिकेत आहेत. भाग्य दिले तू मला या मालिकेनंतर निवेदिता सराफ या नव्या मालिकेत दिसणार आहेत. आई कुठे काय करते ही मालिका संपत असली तरी नवी आई प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता नवी आई प्रेक्षकांची मनं जिंकण्यात किती यशस्वी होते हे 2 डिसेंबरनंतरच कळणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 04, 2024 1:09 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Aai Kuthe Kay Karte : अरुंधती होणार रिटायर्ड, नव्या आईची जॉइनिंग! मराठी TV वर नवा ड्रामा