रितेश भाऊच्या धक्क्यावर येणार अक्षय कुमार, झापुक झुपुक प्रोमोने वाढवली उत्सुकता!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
'बिग बॉस मराठी 5' चा सीझन सुरु होऊन दोन आठवडे झाले. आठवड्याच्या शेवटी रितेश भाऊचा धक्का घरातील स्पर्धकांना मिळत असतो. आज भाऊच्या धक्क्यात खिलाडी अक्षय कुमारही सहभागी होणार आहे.
मुंबई : 'बिग बॉस मराठी 5' चा सीझन सुरु होऊन दोन आठवडे झाले. आठवड्याच्या शेवटी रितेश भाऊचा धक्का घरातील स्पर्धकांना मिळत असतो. आज भाऊच्या धक्क्यात खिलाडी अक्षय कुमारही सहभागी होणार आहे. 'खेल खेल में' या चित्रपटाची टीम आजच्या भाऊच्या धक्क्यात कल्ला करताना दिसेल. त्यामुळे आजचा धक्का स्पर्धकांसाठी हटके असणार आहे.
कालच्या भागात भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने सदस्यांना चांगलाच धडा शिकवला. तर काहींचं कौतुक केलं. आता घरातील खिलाडींना भेटायला भाऊच्या धक्क्यावर खास बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हजेरी लावणार आहे. याता नवा प्रोमोही समोर आलाय.
'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये भाऊच्या धक्क्यावरुन अक्षय कुमार वर्षाला म्हणतोय,"वर्षा किती वर्षांनी दिसतेस". त्यानंतर डीपीला विचारतो,"घरात मटन मिळतंय की नाही". त्यानंतर सूरजच्या स्टाईलने भाऊच्या धक्क्यावर रितेश आणि खिलाडी कुमार झापुक झुपुक थिरकताना दिसतात. एकंदरीतच आजचा भाऊचा धक्का एकदम 'खेल खेल में' स्टाईलने होणार आहे.
advertisement
advertisement
अक्षय कुमारसह फरदीन खान, वाणी कपूर, अम्मी विर्क, प्रज्ञा जायसवाल आणि आदित्य सील हे कलाकारदेखील 'भाऊच्या धक्क्या'वर हजेरी लावणार आहेत. अक्षय कुमारच्या येण्याने भाऊच्या धक्का आणखीनच रंगणार आहे. सध्या 15 स्पर्धक घरामध्ये आहेत. आता पुढचा कोणता सदस्य घराबाहेर होणार याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागून आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 11, 2024 10:10 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
रितेश भाऊच्या धक्क्यावर येणार अक्षय कुमार, झापुक झुपुक प्रोमोने वाढवली उत्सुकता!









