advertisement

Maushmi Chatterjee: ...म्हणून अमिताभ बच्चन यांनी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीवर काढली खुन्नस, स्वत: अभिनेत्रीने केला खुलासा

Last Updated:

बिग बींच्या आग्रहावरून 90च्या शतकातल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीला चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. हे आम्ही नाही तर त्या अभिनेत्रीने एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला आहे.

Maushmi Chatterjee: ...म्हणून अमिताभ बच्चन यांनी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीवर काढली खुन्नस, स्वत: अभिनेत्रीने केला खुलासा
Maushmi Chatterjee: ...म्हणून अमिताभ बच्चन यांनी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीवर काढली खुन्नस, स्वत: अभिनेत्रीने केला खुलासा
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री मौसमी चॅटर्जी (Maushmi Chatterjee) यांनी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली. मौसमी यांनी आपल्या फिल्मी करियरमध्ये जितेंद्र, मिथुन चक्रवर्ती, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. खरंतर, हे सर्व सेलिब्रिटी 70- 80 आणि 90 च्या दशकामध्ये इंडस्ट्रीमध्ये ॲक्टिव्ह होते. त्या काळात अमिताभ यांना चित्रपटांमध्ये कास्ट करण्यासाठी निर्मात्यांची रांग लागत होती. इतकंच नाही तर, निर्माते सुद्धा अमिताभ यांचा सल्ला ऐकायचे. एकदा, बिग बींच्या आग्रहावरून मौसमी चॅटर्जी यांना चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. हे आम्ही नाही तर मौसमी यांनी एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला होता.
मौसमी चॅटर्जी यांनी आपल्या फिल्मी करियरमध्ये अनेक हिट चित्रपट बॉलिवूड इंडस्ट्रीला दिले आहेत. त्यांनी अमिताभ यांच्यासोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यामध्ये बेनाम, रोटी कपडा और मकान, मंजिल सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. इतक्या चित्रपटांमध्ये एकत्र काम करून सुद्धा अमिताभ यांनी मेकर्सकडे मौसमी यांना चित्रपटातून काढून टाकण्यासाठी सांगितले होते. त्या चित्रपटाचं नाव, 'बरसात की एक रात' असं होतं. पहिले चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्या विरूद्ध मौसमी चॅटर्जी काम करणार होत्या. परंतु, मौसमी यांना अचानक चित्रपटातून काढून टाकण्यात आले आणि त्यांच्याजागी राखी गुलजारला कास्ट करण्यात आले.
advertisement
नयनदीप रक्षीतला दिलेल्या मुलाखतीत मौसमी चॅटर्जी यांनी त्यांना चित्रपटातून काढून टाकण्याविषयीच्या मुद्द्यावर भाष्य केले की, "तो चित्रपट प्रॉड्युसर शक्ती सामंतचा 'बरसात की एक रात' चित्रपट होता. एक दिवशी मला शक्ती अंकलने फोन करून विचारलं, 'तुझं अमिताभ सोबत काही भांडण झालंय का?' मी त्यांना म्हणाले, 'काका, मी कोणाशीही इतकी जवळची नाहीये की माझ्याशी भांडू शकेन. मी खूप मैत्रीपूर्ण आणि चांगली आहे, असं मला अनेकजण म्हणाले..' ते म्हणाले की, 'हीच समस्या आहे.', बहुतेक नायक म्हणतात, 'तुम्ही मौसमीला का निवडले? आमचं तिच्यासोबतचं रिलेशन इतकंही खास नाहीये."
advertisement
मौसमी चॅटर्जी यांनी अमिताभ बच्चन किंवा इतर स्टार्ससोबत त्यांचा संवाद कसा होता? याबद्दल सांगितले, अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, "त्यांनी मला विचारले, 'तुला ट्यूनिंग म्हणजे काय हे माहित आहे का?' मी म्हणाले, 'कदाचित, आता मला समजले. कदाचित ते मैत्रीपेक्षा जास्त असेल. पण मी इथे मैत्री करण्यासाठी आलेली नाही. मी इथे काम करण्यासाठी आले आहे. म्हणूनच शक्ती काकांनी मला चित्रपटातून काढून टाकले. मी त्यांना सांगितलं की मी माझी साइनिंग रक्कम परत करत आहे.' मला ते म्हणाले की, 'नाही, ते पैसे ठेव तुझ्याकडे, मी पुढचा चित्रपट तुझ्यासोबत करेन.' मग मी 'आनंद आश्रम' त्यांच्या चित्रपटात काम केले. मी समजू शकते की ते त्यांचं नंबर 1 स्टारसोबत आपलं रिलेशन नाही खराब करू शकत."
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Maushmi Chatterjee: ...म्हणून अमिताभ बच्चन यांनी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीवर काढली खुन्नस, स्वत: अभिनेत्रीने केला खुलासा
Next Article
advertisement
Ola, Uber, Rapidoचा उद्या संप; बाईक टॅक्सीपासून कॅबपर्यंत सगळं ठप्प! ‘ऑल इंडिया ब्रेकडाऊन’ आंदोलन,सरकारला दिला अल्टिमेटम
Ola, Uber, Rapidoचा उद्या संप; बाईक टॅक्सीपासून कॅबपर्यंत सगळं ठप्प!
  • उद्या देशव्यापी संप

  • ओला, उबर, रॅपिडोचा 'ऑल इंडिया ब्रेकडाऊन'

  • ओला-उबर चालकांचा गडकरींना 'अल्टिमेटम'

View All
advertisement