Bigg Boss Marathi 6 : 'तू ही रे माझा मितवा' म्हणत आयुष-तन्वीने अखेर दिली प्रेमाची कबुली; सगळ्यांसमोरच 'रोमान्स'
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Aayush Sanjeev Tanvi Kolte : बिग बॉस मराठी 6 च्या घरात आयुष संजीव आणि तन्वी कोलते यांच्या रिलेशनची चर्चा होतेच आहे. दोघांनीही हे उघडपणे मान्य केलं नाही. पण आता दोघंही वॅलेंटाइन डेला रोमान्स करताना दिसले.
बिग बॉसच्या घरात अनेकांची नाती जुळली आहेत. बिग बॉस मराठी सहाव्या सीझनमध्येही आयुष आणि तन्वी कोलते यांच्या नात्याची चर्चा आतापर्यंत होत आली आहे. त्या दोघांमधील वागणं पाहून नक्कीच यांच्यात काहीतरी सुरू आहे, असं सगळ्यांना वाटतं आहे. पण दोघांनीही आतापर्यंत याला फक्त मैत्रीचं नाव दिलं आहे. आता पहिल्यांदाच दोघांनी सगळ्यांसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी रोमान्सही केला आहे.
आयुष आणि तन्वी यांची मैत्री पहिल्यापासूनच पाहायला मिळते आहे. एकदा दोघांनी ट्विनिंगही केलं होतं. आयुषने मस्करीत तन्वीला स्वमिंग पूलमध्ये ढकललं. त्यानंतर तन्वीनं गुलाबी रंगाची साडी नेसलेली. आयुषनेही गुलाबी रंगाचाशर्ट घातलेला. आयुष आणि तन्वी दोघंही गार्डन एरियामध्ये उभे होते. त्यावेळी आयुष तिला म्हणाला, 'हाच तो पूल ज्यात टाकलं होतं मी फूल…' त्यावर तन्वी त्याला म्हणते, 'तुझा भरवसाच नाहीये, आता पुन्हा काही केलंस तर मरशील'
advertisement

या दोघांमध्ये त्यांच्या स्वभावावरून गप्पाही रंगल्याचं पाहायला मिळालं. आयुष स्वतःला ब्लँड म्हणजेच साधा असल्याचं सांगतो, तर तन्वीला तो स्पायसी म्हणतो. तन्वी म्हणते की, ती खूप इमोशनल आहे आणि जशी आहे तसंच तिला समोरच्याकडून अपेक्षित असतं. यावर आयुष शांतपणे सांगतो की, प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि आपण दोघंही एकमेकांच्या अगदी विरुद्ध स्वभावाचे आहोत. त्यामुळे अपेक्षांमध्येही फरक जाणवतो.
advertisement

हे स्पष्ट करून सांगताना आयुष पदार्थांची उमपा देतो. तो म्हणतो. तो स्वतः ‘व्हेज फ्राईड राइस’सारखा साधा आहे, तर तन्वी म्हणजे ‘ट्रिपल शेजवान मंचूरियन ग्रेव्ही’, त्यावर ऑम्लेट म्हणजेच भरपूर फ्लेवर्स असलेली. आयुषची ही तुलना ऐकून तन्वी गालातल्या गालात हसताना दिसते.
तन्वीने पंचिंग बॅगवर काढला आयुषचा राग
पण काही काळानंतर या नात्यात दुरावा आल्याचंही दिसलं. बिग बॉस घरातील सदस्यांचा एकमेकांवर असलेला राग काढण्यासाठी भाऊच्या धक्क्यावर पंचिंग बॅग आणण्यात आली. संबंधित सदस्याचा फोटो या पंचिंग बॅगवर लावून सगळा राग बाहेर काढायचा होता. तेव्हा तन्वीने आयुषचा फोटो पंचिंग बॅगवर लावला. तिने रडत रडत त्यावर मारलं.
advertisement
तन्वी आणि आयुषमध्ये एवढे दिवस चांगली मैत्री होती. इतकंच नव्हे तर आयुष पहिल्या आठवड्यात गेममध्ये सक्रियपणे खेळताना दिसला नव्हता तेव्हा सुद्धा तन्वीने त्याला मार्गदर्शन केलं होतं. पण, त्यानंतर अचानक या दोघांच्या मैत्रीत दुरावा आला. याचाच जाब तन्वी त्याला पंचिंग बॅगवर त्याचा फोटो लावून विचारणार आहे.

advertisement
तन्वी रागात म्हणाली, "आयुष मी तुला वारंवार बोललीये....तुझ्यामध्ये मी माझा एक बेस्ट फ्रेंड बघते" यावर स्पष्टीकरण देत आयुष सांगतो, "हो! तुझ्या अपेक्षा जास्त आहेत...ज्या मी पूर्ण करू शकत नाही" पुढे तन्वी त्याला सांगते, "मला नाही आवडत आहे तुझी फ्रेंडशिप.."
तन्वी यावेळी आयुषच्या फोटोवर मारताना जोरजोरात रडत असते म्हणून आयुष तिला अडवतो आणि म्हणतो,
advertisement
"हाताला लागेल बास झालं आता..." पण तन्वी काही ऐकत नाही. ती आयुषला बाजूला हो म्हणत बॅगवर मारत राहते आणि म्हणते, "याला का कळत नाहीये की, मला त्रास होतोय या सगळ्याचा"
तन्वी आणि आयुषला एकत्र पाहून रुचिता, राधा, विशाल आणि अनुश्रीला सांगते, 'याची बाहेर गर्लफ्रेंड आहे...इथे कसली नाटकं सुरू आहेत' त्यावर राधा म्हणते, 'अच्छा हे गेमसाठी सुरू आहे…मला नाही आवडलं.' त्यावर अनुश्रीसुद्धा म्हणते, 'मलाही नाही आवडत हे असं…तू जर बाहेर कमिटेड आहेस आणि तू फक्त हे गेमसाठी करतोयस तर हे फार चुकीचं आहे.'
advertisement
यामुळे आयुषच्या आयुष्यातील त्या 'मिस्ट्री गर्ल'चीही चर्चा होऊ लागली. गेल्या काही काळापासून आयुषचं नाव 'वागले की दुनिया' फेम चिन्मयी साळवी हिच्याशी जोडलं जात आहे. आयुषने चिन्मयीच्या वाढदिवसाला केलेली ती खास पोस्ट चाहत्यांच्या आजही लक्षात आहे. "माझ्या करड्या आयुष्यातील तू गुलाबी रंग आहेस," अशा आशयाची पोस्ट शेअर करून आयुषने हिंट दिली होती.
आयुष-तन्वीचं प्रेम खरं की फक्त दिखावा?
त्यामुळे आयुषचं खरं प्रेम नक्की कोण? चिन्मयी की तन्वी? आयुष आणि तन्वीचं हे नातं खरं आहे की केवळ फुटेज मिळवण्याचा प्रयत्न आहे? असा प्रश्न घरातल्यांसह प्रेक्षकांनाही पडला आहे.
दरम्यान आता वॅलेंटाइनच्या निमित्ताने त्यांनी तू ही रे माझा मितवा गाण्यावर सगळ्यांसमोर केलेला रोमँटिक डान्स म्हणजे त्या दोघांची एकमेकांवर असलेल्या प्रेमाची एकप्रकारे असलेली कबुलीच आहे का? असाही प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
Location :
Maharashtra
First Published :
Feb 15, 2026 4:19 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : 'तू ही रे माझा मितवा' म्हणत आयुष-तन्वीने अखेर दिली प्रेमाची कबुली; सगळ्यांसमोरच 'रोमान्स'










