advertisement

Shahid Kapoor: 'ती भाषा आणि त्यातील डायलॉग्स...', मराठी सिनेमात काम करण्याबद्दल स्पष्टच बोलला शाहिद कपूर, ठेवली महत्त्वाची अट

Last Updated:
O Romeo Movie Shahid Kapoor: सध्या चर्चा रंगली आहे ती शाहीदच्या एका मुलाखतीची, ज्यात त्याने मराठी सिनेसृष्टीबद्दल आपलं मत मांडलं आहे. मात्र, त्याने मराठीत काम करण्याबाबत एक अत्यंत महत्त्वाची अट ठेवली आहे.
1/7
बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर सध्या त्याच्या नव्या कोऱ्या 'ओ रोमिओ' या चित्रपटामुळे बॉक्स ऑफिसवर अक्षरशः आग लावत आहे. गँगस्टर 'हुसैन उस्तारा'च्या भूमिकेत शाहीदने जो काही धुमाकूळ घातलाय, ते पाहून फॅन्स वेडे झाले आहेत.

2/7
पण सध्या चर्चा रंगली आहे ती शाहीदच्या एका मुलाखतीची, ज्यात त्याने मराठी सिनेसृष्टीबद्दल आपलं प्रेम आणि आदर व्यक्त केला आहे. मात्र, त्याने मराठीत काम करण्याबाबत एक अत्यंत महत्त्वाची अट ठेवली आहे.

3/7
'ओ रोमिओ'च्या प्रमोशन दरम्यान जेव्हा शाहीदला विचारण्यात आलं की,
'ओ रोमिओ'च्या प्रमोशन दरम्यान जेव्हा शाहीदला विचारण्यात आलं की, "तू मराठी चित्रपट पाहतोस का?" तेव्हा त्याने मोठ्या उत्साहाने उत्तर दिलं. शाहीद म्हणाला, "हो, मी काही खास मराठी चित्रपट नक्कीच पाहिले आहेत. मराठी सिनेसृष्टीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिथले आशय-विषय. खूप सुंदर आणि वास्तववादी कथा तिथे मांडल्या जातात."
advertisement
4/7
बॉलिवूडमधील इतका मोठा स्टार जेव्हा मराठी सिनेमाच्या कंटेंटचं कौतुक करतो, तेव्हा ती संपूर्ण मराठी कलाविश्वासाठी अभिमानाची गोष्ट ठरते. शाहीदला जेव्हा विचारलं की तुला मराठी सिनेमात काम करायला आवडेल का? तेव्हा त्याने जे उत्तर दिलं, त्यातून त्याची कामाप्रती असलेली निष्ठा दिसून आली.

5/7
शाहीद म्हणाला,
शाहीद म्हणाला, "मला मराठीत काम करायला नक्कीच आवडेल, पण माझी एक अट आहे. कोणत्याही भाषेत काम करण्यापूर्वी त्या भाषेवर माझं प्रभुत्व असणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. केवळ डायलॉग पाठ करून बोलण्यात अर्थ नाही."
advertisement
6/7
तो पुढे म्हणाला,
तो पुढे म्हणाला, "जर भविष्यात मला मराठीत एखादी उत्तम भूमिका ऑफर झाली, तर मी सर्वात आधी वेळ काढून ही भाषा नीट आत्मसात करेन. जेव्हा मला मराठी नीट बोलता येईल, तेव्हाच मी कॅमेऱ्यासमोर उभा राहीन. कारण भाषेची जाण असल्याशिवाय मी त्या भूमिकेला पूर्ण न्याय देऊ शकणार नाही असं मला वाटतं."
advertisement
7/7
विशेष म्हणजे, शाहीदच्या 'ओ रोमिओ' या हिंदी चित्रपटात शास्त्रीय संगीताने मंत्रमुग्ध करणारे राहुल देशपांडे एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहेत.
विशेष म्हणजे, शाहीदच्या 'ओ रोमिओ' या हिंदी चित्रपटात शास्त्रीय संगीताने मंत्रमुग्ध करणारे राहुल देशपांडे एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहेत. 
advertisement
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement