advertisement

राहूची वाढणार ताकद, मंगळसह युती होताच 'या' 3 राशींना करणार टार्गेट; सोसावे लागणार हाल!

Last Updated:

ज्योतिषशास्त्रानुसार 23 फेब्रुवारी 2026 पासून ग्रहांची एक अत्यंत स्फोटक स्थिती निर्माण होत आहे. ऊर्जेचा कारक मंगळ ग्रह शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, जिथे आधीच सावली ग्रह राहू ठाण मांडून बसलेला आहे.

News18
News18
Rahu Mangal Yuti 2026 : ज्योतिषशास्त्रानुसार 23 फेब्रुवारी 2026 पासून ग्रहांची एक अत्यंत स्फोटक स्थिती निर्माण होत आहे. ऊर्जेचा कारक मंगळ ग्रह शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, जिथे आधीच सावली ग्रह राहू ठाण मांडून बसलेला आहे. जेव्हा मंगळ आणि राहू एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा ज्योतिषशास्त्रात याला 'अंगारक योग' असे म्हणतात. राहू हा मुळातच भ्रम आणि अचानक घडणाऱ्या घटनांचा कारक आहे. मंगळाच्या शक्तीसोबत राहूची ताकद अधिकच वाढणार आहे. या नकारात्मक युतीमुळे या तीन राशींच्या जातकांनी अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे, कारण ते या युतीचे मुख्य 'टार्गेट' ठरू शकतात.
मेष - अचानक संकटांची मालिका
मेष राशीचा स्वामी स्वतः मंगळ आहे. राहू सोबतची ही युती तुमच्या अकराव्या भावात होत आहे. तुम्हाला अचानक धनलाभाचे आमिष दाखवले जाऊ शकते, पण मोठ्या गुंतवणुकीत फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. तुमचा स्वभाव अधिक आक्रमक आणि हट्टी होऊ शकतो, ज्यामुळे मित्र आणि नातेवाईकांशी संबंध बिघडण्याची शक्यता आहे. कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका आणि शेअर बाजारापासून दूर राहा.
advertisement
मकर - कौटुंबिक आणि वाणीवर ताण
मकर राशीच्या जातकांसाठी ही युती दुसऱ्या भावात होत आहे. तुमच्या शब्दांमुळे कुटुंबात मोठे वाद निर्माण होऊ शकतात. रागाच्या भरात तुम्ही कोणालाही अपशब्द बोलू शकता, ज्याचा पश्चात्ताप भविष्यात करावा लागेल. डोळे किंवा दातांशी संबंधित समस्या जाणवू शकतात. तसेच, साठवलेले धन अनावश्यक कामात खर्च होण्याची शक्यता आहे. बोलताना संयम ठेवा आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या.
advertisement
मीन - मानसिक भ्रम आणि खर्च
मीन राशीच्या जातकांसाठी मंगळ-राहूची युती बाराव्या भावात होत आहे. हॉस्पिटल किंवा कोर्ट-कचेरीच्या कामात तुमचे पैसे खर्च होऊ शकतात. राहू तुम्हाला भ्रमित करेल, ज्यामुळे तुम्हाला चुकीचे निर्णय घेण्यास प्रवृत्त केले जाईल. रात्री झोप न येणे किंवा विचित्र स्वप्ने पडणे असे प्रकार घडू शकतात. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका आणि शक्य असल्यास या काळात कर्ज घेणे किंवा देणे टाळा.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
राहूची वाढणार ताकद, मंगळसह युती होताच 'या' 3 राशींना करणार टार्गेट; सोसावे लागणार हाल!
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement