Balbhaarati Song: शाळेच्या आठवणींमध्ये पुन्हा एकदा हरवून जा, मराठमोळ्या 'बालभारती' पुस्तकाचं नवं कोरं गाणं रिलीज
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बालभारतीसोबत नाळ जोडली गेली आहे. बालपणापासून बालभारती पुस्तक वाचत आलेल्या पुस्तकाचं एक गाणं नुकतंच सोशल मीडियावर रिलीज झालं आहे.
शाळेमध्ये आपण प्रत्येकाने 'बालभारती' या पुस्तकातूनच शिक्षण घेतलंय. 'बालभारती' हे पुस्तक महाराष्ट्र बोर्डामध्ये मराठी विषयासाठी आहे. 'बालभारती'च्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त प्रेक्षकांच्या भेटीला 'बालभारती' गीत आलं आहे. 'बालभारती'ला यावर्षी एकूण ६० वर्षे पूर्ण झाले आहे, त्यानिमित्त हे खास गाणं तयार करण्यात आलं आहे. गेल्या अनेक पिढ्या 'बालभारती'च्या माध्यमातून आपलं शिक्षण घेत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बालभारतीसोबत एक नाळ जोडली गेली आहे. आता त्याच बालभारतीचं एक गाणं नुकतंच सोशल मीडियावर रिलीज झालं आहे.
'बालभारती'च्या गाण्याला लोकप्रिय गायिका वैशाली सामंतचा आवाज लाभला असून अवधूत गुप्तेने संगीत दिलं आहे. तर दासू वैद्य यांनी ह्या गाण्याला शब्द दिले आहेत. या गाण्याच्या माध्यमातून बालभारतीच्या पुस्तकासोबत प्रत्येकाच्या जोडलेल्या आठवणी आणि भावना या गाण्यातून सुंदरपणे उलगडण्यात आले आहेत. सध्या या गाण्याची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा सुरू आहे. २७ जानेवारी २०२७ रोजी 'बालभारती' पुस्तकाला ६० वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. बालभारती हे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांसाठी केवळ अभ्यासाचं साधन नसून बालपणाचा कोवळा उजेड, संस्कारांची शिदोरी आणि कल्पनाशक्तीला पंख देणारं आहे.
advertisement
'बालभारती' हे गाणं ऐकताना आणि पाहताना तुम्हाला नकळत शाळेतल्या जीवनाची आठवण करून देईल. बालपणीच्या आठवणी, पुस्तकांचा सुगंध आणि पुस्तकावरील बोलकी चित्र अशा सर्व आठवणी आपसुकच आपल्या नजरेसमोरून जातील. 'बालभारती' पुस्तकातून प्रत्येकाने आपल्या शाळेमध्ये अभ्यास केला आहे. 'बालभारती' म्हणजेच मराठी विषय. अनेक कवींच्या कविता आणि अनेक लेखकांचे धडे आपण या पुस्तकातून शिकलो आहोत. अगदी लिहिण्यापासून वाचणापर्यंत आपण 'बालभारती'चा आधार घेतला आहे. दरम्यान, बालभारतीच्या पुस्तकांनी दिलेले संस्कार, कल्पनाशक्ती आणि ज्ञानप्रवास हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात घर करून आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 4:35 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Balbhaarati Song: शाळेच्या आठवणींमध्ये पुन्हा एकदा हरवून जा, मराठमोळ्या 'बालभारती' पुस्तकाचं नवं कोरं गाणं रिलीज









