advertisement

निवडणुकीनंतर EVM ढाब्यावर, राज्यात संतापाची लाट, डेप्युटी कलेक्टर म्हणाले, मशीन होत्या हे खरंय पण....

Last Updated:

Solapur ZP And Panchayat Samiti Election: सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन चक्क धाब्यावर (हॉटेल) आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यावर उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

सोलापूर ईव्हीएम हॉटेलमध्ये सापडल्याचे प्रकरण
सोलापूर ईव्हीएम हॉटेलमध्ये सापडल्याचे प्रकरण
प्रीतम पंडित, प्रतिनिधी, सोलापूर : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान पार पडले. जिल्हा परिषदेच्या ७३१ तर पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. दरम्यान मतदानानंतर ईव्हीएम चक्क ढाब्यावर (हॉटेल) आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समोर आलेल्या प्रकारानंतर राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत दोषींवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन चक्क धाब्यावर (हॉटेल) आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यावेळी दोन सीलबंद EVM देखील आढळून आल्याने खळबळ उडाली. या साऱ्या प्रकारावर उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मशीन होत्या हे खरंय पण...

मशीन ढाब्यावर (हॉटेल) आढळलेला प्रकार दुर्दैवी आणि गंभीर आहे. याप्रकरणी आम्ही संबंधितांवर कारवाई करणार आहोत. सदर घटना ही गंभीर आणि दुर्दैवी आहे, असे स्पष्टीकरण उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी दिले. आढळून आलेल्या ईव्हीएम मशीन अतिरिक्त होत्या. त्या मतदानासाठी वापरण्यात आलेल्या नाहीत, अशी सारवासारव त्यांनी केली.
advertisement

अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये विसंवाद

झोनल अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त दोन मशीन ठेवण्यात आल्या होत्या. मात्र वाहन चालक आणि अधिकारी यांच्यात संवादाचा अभाव राहिल्याने हा प्रकार घडला असावा. त्या मशीन स्ट्रॉंग रूममध्ये स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

अर्जुनसिंह मोहिते पाटलांवर कारवाई होणार

आपल्या मुलाला मतदान यंत्राचे बटन दाबायला लावणे चुकीचे असून संबंधित मतदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचे चुलत भाऊ अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाईचे संकेत त्यांनी दिले.
advertisement

ईव्हीएमवर जादूटोण्याचा प्रकार

ईव्हीएमखाली जादूटोणा केल्याची तक्रार समोर आली आहे. मात्र ईव्हीएम हे जादूटोण्यावर चालत नसून घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. या प्रकरणात केंद्रप्रमुखांची चूक नसून कोणीतरी खोडसापणे हा प्रकार केल्याचे दिसते. या घटनेबाबत तपास करणे थोडेसे कठीण आहे मात्र आम्ही त्याबाबत सूचना केल्यात, असे उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
निवडणुकीनंतर EVM ढाब्यावर, राज्यात संतापाची लाट, डेप्युटी कलेक्टर म्हणाले, मशीन होत्या हे खरंय पण....
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement