Coldplay फेम Chris Martin पोहचला महाकुंभात, गंगेत करणार पवित्र स्नान, VIDEO
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
ख्रिस मार्टिन त्याच्या गर्लफ्रेंडसह थेट प्रयागराजला पोहोचला आहे. यासंबंधीचा व्हिडीओ एएनआयने शेअर केला आहे.
Chris Martin At Mahakumbh : सध्या सर्वत्र महाकुंभाची धामधुम पाहायला मिळतेय. १४४ वर्षांनी आलेल्या महाकुंभात अनेकजण सहभागी झाले आहेत. महाकुंभ मेळा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक उत्सव असून यात लाखो भाविक सहभागी होतात. 13 जानेवारीला प्रयागराजमधील संगमाच्या काठी महाकुंभाचा भव्य शुभारंभ झाला आहे.
दरम्यान आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी महाकुंभात सहभागी होऊन गंगेत पवित्र स्नान केले आहे. अशातच सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्टार ख्रिस मार्टिन याने प्रयागराज येथील महाकुंभाला हजेरी लावली आहे. प्रसिद्ध म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर करत असलेल्या कोल्डप्ले बँडचे सध्या भारतात कॉन्सर्ट्स सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी डीवाय पाटील स्टेडियमवर कोल्डप्ले कॉन्सर्ट पार पडला होता. यावेळी गायक ख्रिस मार्टिन याने कॉन्सर्टला आलेल्या चाहत्यांशी मराठी आणि हिंदी भाषेत संवाद साधून त्यांचं मन जिंकलं. आता ख्रिस मार्टिन त्याच्या गर्लफ्रेंडसह थेट प्रयागराजला पोहोचला आहे. यासंबंधीचा व्हिडीओ एएनआयने शेअर केला आहे.
advertisement
#WATCH | Uttar Pradesh | American actress Dakota Johnson and co-founder of the rock band Coldplay & singer Chris Martin at Prayagraj #MahaKumbhMela2025 pic.twitter.com/8kttMyjrdG
— ANI (@ANI) January 27, 2025
advertisement
हिंदी आणि मराठी बोलून मन जिंकणारा ख्रिस मार्टिन सोमवारी महाकुंभला पोहोचला. येथील त्रिवेणी संगमात तो स्नान करेल. याआधी रविवारी त्याच्या कोल्डप्ले कॉन्सर्टने गुजरातमध्ये खळबळ उडवून दिली होती. त्याने वंदे मातरम आणि माँ तुझे सलाम... हे गाणे गायले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 27, 2025 7:36 PM IST







