Dev Anand Bungalow : देव आनंदच्या आलिशान बंगल्याजागी बनणार 22मजली इमारत; कोटींना विकली जुहूतील जागा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
देव आनंद यांच्या या बंगल्याच्या ठिकाणी आता 22 मजली टॉवर उभा राहणार आहे. जुहूतील प्रसिद्ध ठिकाणी असलेलं हा आलिशान बंगला कोटी रुपयांना विकला आहे.
मुंबई, 2 सप्टेंबर : बॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांना पाहण्यासाठी चाहत्यांची जितकी गर्दी होते तितकीच गर्दी त्यांची बंगले पाहण्यासाठी होते. मुंबईतील बॅंड्रा आणि जुहू या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बॉलिवूड कलाकारांची घरं आहेत. प्रत्येकाच्या बंगल्याची एक वेगळी खासियत आहे. प्रत्येकाच्या घराचं एक वेगळं आकर्षक नाव आहे. दिवंगत अभिनेते देव आनंद यांचं मुंबईच्या जुहू येथील बंगला अनेक दिवसांपासून चर्चेत होता. अभिनेत्याचा हाच बंगला आता विकण्यात आलाय. देव आनंद यांची पत्नी कल्पना कार्तिक, मुलगा सुनील आनंद आणि मुलगी देविना आनंद अनेक वर्ष या बंगल्यात पाहत होते. देवा आनंद यांनी त्यांच्या आयुष्यातील फार महत्त्वाचे क्षण या बंगल्यात घालवले आहेत. देव आनंद यांच्या या बंगल्याच्या ठिकाणी आता 22 मजली टॉवर उभा राहणार आहे अशी माहिती समोर आली आहे.
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, देव आनंद यांचा जुहू येथील बंगला एका रिअल इस्टेड कंपनीला विकण्यात आला आहे. बंगल्याचं डिल झालं असून आता पुढील कागदोपत्री कारवाई सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देव आनंद यांचा जुहू येथील आलिशान बंगला तब्बल 400 कोटी रुपयांना विकण्यात आला आहे.
हेही वाचा - Antilia मधील बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला किंग खान, कुटुंबासोबत पहिल्यांदा आला मीडियासमोर
मुंबईतील जुहू हा भाग बॉलिवूड सेलिब्रेटींच्या राहण्याचं एक मुख्य ठिकाण आहे. अनेक मोठे सेलिब्रेटी आणि बिझनेसमन या भागात राहतात. देव आनंद यांचा हा बंगला अनेक मोठ्या बिझनेसमन लोकांच्या बंगल्यांमध्ये होता. देव आनंदच्या अपार्टमेंटच्या आजूबाजूला अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने आणि डिंपल कापाडिया हे कलाकार देखील राहिले आहेत. जुहूतील अगदी प्राइम लोकेशनवर हा बंगला आहे.
advertisement

म्हटलं जात आहे की, देव आनंद यांनी हा बंगला जेव्हा बनवला तेव्हा तो इतका प्रसिद्ध नव्हता. त्या एरियात फार कोणी राहत नव्हतं. मोठा जंगलाचा परिसर तिथे होता. पण आज तो एरिओ जुहूमधील सर्वात पॉश एरिया झाला आहे. देव आनंद यांनी त्याच्या वयाची जवळपास 40 वर्ष या बंगल्यात घालवली आहेत. त्यांच्या मृत्यू 2011 साली झाला. मृत्यूच्या काही वर्षांनी त्यांचा हा आलिशान बंगला ओस पडूलागला होता. कारण त्याचा मुलगा सुनील आनंद हा यूएसमध्ये राहतो. तर मुलगी देवीना आपल्या आईबरोबर ऊटी येथे राहते. त्यामुळे मुंबईतील हे आलिशान घर अनेक वर्ष रिकामी आहे. याच कारणामुळे त्यांनी त्यांनी बंगला विकण्याचा निर्णय घेतला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 20, 2023 12:15 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dev Anand Bungalow : देव आनंदच्या आलिशान बंगल्याजागी बनणार 22मजली इमारत; कोटींना विकली जुहूतील जागा





