advertisement

dhurandhar 2: धुरंधर 2 वर बंदी घाला, याचिकाकर्त्याची थेट हायकोर्टात याचिका, काय आहे कारण?

Last Updated:

बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालत असताना आता या सिनेमाच्या स्क्रिनिंगवर बंदी घालावी अशी मागणी जोर धरत आहे. यामागे नेमकं काय कारण आहे जाणून घेऊया.

News18
News18
धुरंधर 2 बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत असताना त्याच्यावर बंदी घालावी अशी मागणी थेट सुरू झाली आहे. देशभरातच नाही तर भारताबाहेरही धुरंधर 2 ची क्रेझ आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालत असताना आता या सिनेमाच्या स्क्रिनिंगवर बंदी घालावी अशी मागणी जोर धरत आहे.
यासाठी चक्क हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे धुरंधरच्या टीमसमोर देखील मोठा पेच निर्माण झाला आहे. तमिळनाडूमध्ये आदर्श आचारसंहिता लागू असताना धुरंधर २ हा चित्रपट प्रदर्शित होणं म्हणजे थेट नियमांना पायदळी तुटवत केराची टोपली दाखवण्यासारखं, असल्याचा दावा अ‍ॅडव्होकेट शीला यांनी मद्रास उच्च न्यायालयात केला आहे.
या चित्रपटामध्ये राजकीय आशय असून तो एका विशिष्ट राजकीय पक्षाचा प्रचार करणारा आहे असा आरोप या याचिकेतून करण्यात आला. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत कोणताही प्रपोगंडा सेट करण्यासाठी याचा वापर होऊ नये यासाठी या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी असं म्हटलं आहे. मुख्य न्यायमूर्ती एस. ए. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती जी. अरुल मुरुगन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची तातडीची सुनावणी घेण्याची विनंती केली आहे.
advertisement
याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, धुरंधर २ चित्रपटातील संवाद आणि कथानक मतदारांच्या मनावर प्रभाव टाकू शकते. निवडणुकीच्या काळात अशा प्रकारे एखाद्या पक्षाची बाजू घेणारा चित्रपट प्रदर्शित करणे म्हणजे मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तमिळनाडूमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांमुळे कडक आचारसंहिता लागू आहे.
अशा वातावरणात राजकीय रंग असलेला चित्रपट प्रदर्शित झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो किंवा निवडणुकीच्या निष्पक्षतेवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट निवडणुका पूर्ण झाल्यावरच प्रदर्शित करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कोर्टाकडे करण्यात आली आहे.
advertisement
चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी खेचण्यासाठी सज्ज असलेल्या धुरंधर २ च्या निर्मात्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. जर कोर्टाने यावर स्थगिती दिली, तर प्रदर्शनाची तारीख लांबणीवर पडू शकते. आता यावर मद्रास उच्च न्यायालय काय निकाल देणार, याकडे तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळासोबतच सिनेसृष्टीचंही लक्ष लागलं आहे.
याचा फटका धुरंधरच्य बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी देखील बसण्याचा शक्यता आहे. त्यामुळे धुरंधर 2 च्या टीमसमोर सध्या मोठा पेच निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे कोर्ट काय निर्णय देतं हे देखील पाहावं लागणार आहे. लोक धुरंधर 2 पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे थिएटरला मिळाला नाही तर मोबाईलवर पायरेटेड मिळेल का यासाठी प्रयत्न करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
dhurandhar 2: धुरंधर 2 वर बंदी घाला, याचिकाकर्त्याची थेट हायकोर्टात याचिका, काय आहे कारण?
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement