advertisement

अखेर सस्पेन्स संपला! ना सलमान खान, ना इमरान हाश्मी; 'बडे साहाब' च्या भूमिकेत दिसला 'हा' प्रसिद्ध अभिनेता, तुम्ही ओळखलं?

Last Updated:

Who is Bade Sahab in Dhurandhar 2: बॉलिवूडमधील अनेक स्टार्सच्या नावाचा विचार या पात्रासाठी प्रेक्षक करत होते. अशातच आता 'धुरंधर २' रिलीज झाला असून हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याच्या नावावरून पडदा उठला आहे.

News18
News18
मुंबई: आज १९ मार्च हा दिवस संपूर्ण देशात जल्लोषात साजरा होतोय. एकीकडे हिंदू नववर्षानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतानाच, आजच रिलीज झालेला 'धुरंधर २' पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटर्समध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. पहिल्या भागाने जगभरात १३०० कोटींची धमाकेदार कमाई केल्यानंतर दुसऱ्या भागात नेमकं काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले होते. अखेर, त्यांची प्रतीक्षा संपली असून 'धुरंधर २' आज १९ मार्चला चित्रपटगृहांमध्ये धडकला आहे.
धुरंधरच्या पहिल्या भागात अक्षय खन्ना, संजय दत्त, रणवीर सिंग, सारा अर्जुन, आर माधवन यांबरोबरच संपूर्ण कास्टने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं. दुसऱ्या भागात कोणते कलाकार चित्रपटाची रंगत आणखी वाढवणार याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता ताणली होती. पहिल्या भागात सातत्याने उल्लेख झालेले 'बडे साहाब' नक्की कोण आहेत, हा प्रश्न प्रेक्षकांना सतावत होता. बॉलिवूडमधील अनेक स्टार्सच्या नावाचा विचार या पात्रासाठी प्रेक्षक करत होते. अशातच आता 'धुरंधर २' रिलीज झाला असून हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याच्या नावावरून पडदा उठला आहे.
advertisement

अखेर सस्पेन्स संपला, कोण आहेत 'बडे साहाब'?

'बडे साहाब' या भूमिकेसाठी सलमान खान, इमरान हाश्मी, अक्षय कुमार यांच्या नावांची चर्चा सुरू होती. मात्र एका वेगळ्याच अभिनेत्याच्या पदरी ही भूमिका पडल्याचं चित्रपटात पाहायला मिळतंय. 'धुरंधर'मध्ये अनेकदा 'बडे साहाब' हे नाव घेतलं गेलंय. यानुसार हा कोणीतरी महत्त्वाचा मास्टरमाइंड असल्याचं समोर आलं होतं. अखेर आता हा सस्पेन्स संपला असून त्या अभिनेत्याचं नाव समोर आलं आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये 'बडे साहाब' हे पात्र दाखवण्यात आलं आहे. त्यानुसार 'बडे साहाब' हे पात्र अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर आधारित असून या भूमिकेत अभिनेता दानिश इकबाल दिसून आला आहे. याआधी 'महारानी २' मध्ये दानिशने दिलशाद मिर्जा हे पात्र साकारले होते आणि नुकतंच तो नाना पाटेकरांच्या 'संकल्प'मध्येही दिसला होता.
advertisement
दरम्यान, दानिशचा स्क्रीन टाइम अतिशय कमी असून त्याच्यावर प्रॉस्थेटिकचा मोठा वापर करण्यात आला आहे. चित्रपटात तो अतिशय वयस्कर दाखवण्यात आले असून तो आजारी असल्याचं दिसतंय. या सीनमध्ये तो भारताविरुद्ध प्लॅनिंग करत असून 'मेजर इक्बाल' म्हणजेच अभिनेता अर्जुन रामपाल त्याची आणि रणवीरची भेट घडवून देतो. 'बडे साहाब'चे हे पात्र किडनीच्या आजाराशी झुंज देत असून तो ऑक्सिजन सपोर्टवर असल्याचे दाखवले आहे. भिंतींवर दाऊदचे फोटो आणि त्याच्या तरुणपणीच्या दिवसांची एक झलकही आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
अखेर सस्पेन्स संपला! ना सलमान खान, ना इमरान हाश्मी; 'बडे साहाब' च्या भूमिकेत दिसला 'हा' प्रसिद्ध अभिनेता, तुम्ही ओळखलं?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement