'मला बाळ झालं तर...' भयानक मृत्यूआधी प्रेग्नेंट होती दिव्या भारती? या अभिनेत्रीजवळ केलेला बाळाविषयी खुलासा
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
अवघ्या तीन वर्षांच्या करिअरमध्ये दिव्या घराघरात पोहचली होती. पण एक दिवस अचानक आलेल्या तिच्या निधनाच्या बातमीनं सर्वांना सुन्न करून सोडलं होतं.
मुंबई : वयाच्या 19 व्या वर्षीच बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे दिव्या भारती. तिच्या मृत्यूला बरीच वर्ष लोटली असली तरी आजही ती लोकांच्या हृदयात जिवंत आहे. अवघ्या तीन वर्षांच्या करिअरमध्ये दिव्या घराघरात पोहचली होती. पण एक दिवस अचानक आलेल्या तिच्या निधनाच्या बातमीनं सर्वांना सुन्न करून सोडलं होतं.
दिव्या भारतीचा जन्म 25 फेब्रुवारी 1974 मध्ये झाला होता. 19 व्या वर्षी एक्झिट घेतलेल्या दिव्यानं फक्त 3 वर्षांच्या करिअरमध्ये 21 सिनेमे केले होते. 19 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी दिव्या फार कमी वेळातच तरुणांच्या मनावर राज्य करु लागली. तिचं सौंदर्य, अभिनय आणि निरागसता याचे लोक दिवाने झाले. दिव्याने फार कमी वयात या जगातून एक्झिट घेतली असली तरी तिचे इंडस्ट्रीतील मित्र - मैत्रिणी आजही तिची आठवण काढतात. आता नुकतंच अभिनेत्री सोनम खानने दिव्या भरतीची आठवण काढत एक खुलासा केला आहे.
advertisement
अभिनेत्री सोनम खान अनेकदा दिव्या भारतीचं कौतुक करते. सोनमचं फिल्मी करिअर फार काळ टिकलं नाही, पण तिच्या 6 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये तिने मिथुन चक्रवर्ती, गोविंदा, सनी देओल, गोविंदा, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक बड्या कलाकारांसोबत काम केलं. यादरम्यान तिची दिव्या भारतीशीही मैत्री झाली.
advertisement
दिव्या भारतीच्या जाण्यानं बॉलिवूडचं मोठं नुकसान झाल्याचं सोनम खाननं म्हटलं आहे. सोनमने दिव्यासोबत झालेल्या शेवटच्या बोलण्याचा खुलासा केला आहे. सोनमने सांगितले की, वर्सोवा येथील पाचव्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पडण्याच्या काही दिवस आधी ५ एप्रिल १९९३ रोजी तिचे भारतीसोबत शेवटचं बोलणं झालं होतं.
सोनम खान बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “दिव्या भारतीने मला चंद्राकडे पाहण्यास सांगितलं आणि माझं मूलही माझ्यासारखेच सुंदर असेल असं ती म्हणाली. ती एक अभिनेत्री होती जिच्याशी माझं चांगलं नातं होतं आणि ती कुठेही असली तरी मला आशा आहे की ती आनंदी आहे. मी आणखी काय बोलू?" असा खुलासा अभिनेत्रीनं केला आहे.
advertisement
सोनम खान म्हणाली, “ती खूप छान मुलगी होती. आज ती जिवंत असती तर ती वरती असती. तिच्यासोबत झालेला अपघात दुःखद आहे.'' असा खुलासा तिने केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 19, 2024 4:06 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'मला बाळ झालं तर...' भयानक मृत्यूआधी प्रेग्नेंट होती दिव्या भारती? या अभिनेत्रीजवळ केलेला बाळाविषयी खुलासा