Dhurandhar 2 चं वादळही फिकं! झाली 'राजा शिवाजी'ची एंट्री, घुमला 'हर हर महादेव'चा नारा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Dhurandhar 2 Raja Shivaji : बहुप्रतीक्षित 'धुरंदर: द रिव्हेंज' फिल्म अखेर थिएटरमध्ये रिलीज झाली आहे. पण धुरंधर 2 पाहायला गेलेल्या प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त असं सरप्राईझ मिळालं आहे. ज्यासमोर धरंधरचं वादळही फिक पडलं.
गेल्या काही दिवसांपासून धुरंदर 2 चं वादळ सुस्साट आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंदर: द रिव्हेंज' फिल्म अखेर थिएटरमध्ये रिलीज झाली आहे. पण या फिल्मचं वादळ एका गोष्टीसमोर मात्र फिकं पडलं आहे. धुरंधर 2 रिलीजच्या वेळी 'राजा शिवाजी'ची एंट्री झाली आहे आणि थिएटरमध्ये हर हर महादेवचा नारा घुमला आहे.
धुरंधर 2 पाहायला गेलेल्या प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त असं सरप्राईझ मिळालं आहे. फिल्म रिलीजसोबत एका फिल्मचा टिझर प्रेक्षकांना पाहायला मिळाला. ही फिल्म आहे 'राजा शिवाजी'. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, स्वाभिमानाची आणि स्वराज्याच्या स्थापनेच्या प्रवासाची झलक. एका महान योद्धाची गाथा आणि स्वराज्य स्थापनेचा संघर्ष टीझरमध्ये पाहायला मिळतो आहे.
advertisement
रितेश देशमुख शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन स्वत: रितेशने केलं आहे. जेनिलिया देशमुख आणि ज्योती देशपांडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अजय- अतुल यांच्या खांद्यावर आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्मच्या बॅनरखाली चित्रपट तयार झालेला आहे.
advertisement
महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून 'राजा शिवाजी' चित्रपट 1 मे 2026 रोजी संपूर्ण देशभरात रिलीज होणार आहे. मराठी, हिंदी आणि तेलुगु या तीन भाषांमध्ये बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. रितेश देशमुखला पहिल्यांदाच 'राजा शिवाजी' चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 19, 2026 2:04 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dhurandhar 2 चं वादळही फिकं! झाली 'राजा शिवाजी'ची एंट्री, घुमला 'हर हर महादेव'चा नारा








