advertisement

Don 3 News: रणवीर–फरहानमध्ये बिनसलं! ‘डॉन 3’ मागचं खळबळजनक सत्य, 40 कोटींचं नुकसान कोण भरून देणार?

Last Updated:

रणवीर सिंगने 'डॉन 3' चित्रपटातून एक्झिट घेतल्याची माहिती आहे. पण रणवीर सिंगने चित्रपटातून अचानक एक्झिट घेतल्यामुळे निर्मात्यांना झालेला 40 कोटींचं नुकसान कोण भरून देणार? याची सध्या चर्चा सुरू आहे.

Don 3 च्या मेकर्सला मोठा झटका! निर्मात्यांना झालेलं 40 कोटींचं नुकसान कोण भरून देणार?
Don 3 च्या मेकर्सला मोठा झटका! निर्मात्यांना झालेलं 40 कोटींचं नुकसान कोण भरून देणार?
मुंबई: रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि फरहान अख्तर (Farhaan Akhtar) यांच्या 'डॉन 3' चित्रपटाची (Don 3 Film) चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. फरहान अख्तरकडून चित्रपटाची घोषणा करण्यात आल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. आता प्रेक्षकांच्या उत्सुकतेवर कदाचित पाणी फिरण्याची शक्यता आहे. कारण, रणवीर सिंगने 'डॉन 3' चित्रपटातून एक्झिट घेतल्याची माहिती आहे. पण रणवीर सिंगने चित्रपटातून का एक्झिट घेतलीये याचं कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. अभिनेत्याने या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एका इंग्रजी वेबसाईटने या बद्दलची माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर सिंगने काही क्रिएटिव्ह कारणांमुळे चित्रपटातून एक्झिट घेतल्याची माहिती आहे. अभिनेत्याने अचानक चित्रपटातून एक्झिट घेतल्यामुळे एक्सेल एंटरटेन्मेंटला करोडोंचे नुकसान झाले आहे. रणवीर सिंगने हे विचित्र पाऊल उचलल्यामुळे निर्मात्यांना तब्बल 40 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. इंडस्ट्रीतल्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर सिंगकडून चित्रपटाला ग्रीन सिग्नल देण्यात आला होता. एक्सेल एन्टरटेन्मेटने 'डॉन 3'ची तयारी सुरू केली होती, परंतु ज्या पद्धतीने त्याने अचानक प्रोजेक्ट सोडला, त्यामुळे या मोठ्या नुकसानाची भरपाई कोण करेल? याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेत्याने घेतलेल्या या मोठ्या निर्णयाची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
advertisement
व्हरायटी इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, प्रॉडक्शन हाऊसकडून शुटिंग लोकेशन्सवर प्री- प्रॉडक्शनचं कामही सुरू केलं होतं, त्यासाठी प्रॉडक्शन हाऊसने मोठ्या प्रमाणावर खर्चही केला होता. रणवीर सिंगने अचानक प्रोजेक्टमधून एक्झिट घेतल्यानंतर निर्मात्यांनी संबंधितांना पत्राच्या माध्यमातून तुम्ही इतर प्रोजेक्टसाठी काम करू शकता, अशी माहिती दिली. कारण, 'डॉन 3' चित्रपट बनणार नाहीये. प्रॉडक्शन हाऊसच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर सिंगने बॅनरला झालेल्या नुकसानाची भरपाई करावी, परंतु त्याने जवळजवळ हार मानली आहे. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "रणवीर सिंगने क्रिएटिव्ह स्टोरीच्या मतभेदांमुळे या चित्रपटातून एक्झिट घेतली आहे. शिवाय, अभिनेता स्क्रिप्टवरही नाराज होता. त्याने निर्मात्यांना स्क्रिप्टमध्ये सुधारणा करण्याची वारंवार विनंतीही केली होती. परंतु त्याला मिळत असलेल्या निकालांवर तो खूश नव्हता. दुसरीकडे, एक्सेल एंटरटेनमेंटचा दावा आहे की त्यांनी रणवीर सिंगच्या मंजुरीनंतरच प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू केले."
advertisement
डॉन ३ भोवतीच्या वादानंतर, 40 कोटी रुपयांचे नुकसान कोण भरून देणार? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. निर्मात्यांचे मत आहे की, रणवीर सिंगने हे नुकसान केले आहे, पण त्यानेच नुकसानाची जबाबदारी नाकारली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Don 3 News: रणवीर–फरहानमध्ये बिनसलं! ‘डॉन 3’ मागचं खळबळजनक सत्य, 40 कोटींचं नुकसान कोण भरून देणार?
Next Article
advertisement
अजितदादांचा उमेदवार ठरला 'जायंट किलर', दिग्गज नेत्याच्या मुलाचा पराभव; कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ, संपूर्ण राज्यात चर्चा
Kolhapur ZP: अजितदादांचा उमेदवार ठरला जायंट किलर, दिग्गज नेत्याच्या मुलाचा पराभव
  • अजितदादांचा उमेदवार ठरला जायंट किलर

  • जिल्हा परिषद निकालांनी नवं गणित

  • कोल्हापूरमधील निकालांने धक्का

View All
advertisement