Latur ZP Election : सुनेत्रा वहिनी ठरणार किंगमेकर! लातूरची समीकरणं बदलली, भाजपला मोठा धक्का
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. 2017 च्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 36 जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवलेली भाजप यंदाच्या निवडणुकीत निम्म्यावर आली आहे.
शशिकांत पाटील
लातूर : लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. 2017 च्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 36 जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवलेली भाजप यंदाच्या निवडणुकीत निम्म्यावर म्हणजेच 18 जागांवर आली आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस 15 जागांवरून 23 जागांवर तर अजित पवारांची राष्ट्रवादी 5 जागांवरून 12 जागांवर पोहोचली आहे. दोन्ही शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मनसेला प्रत्येकी 1-1 जागा मिळाली आहे. याशिवाय दोन अपक्ष उमेदवारही निवडून आले आहेत.
advertisement
2017 मध्ये स्वबळावर सत्ता स्थापन केलेल्या भाजपला यंदा लातूर जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार या दोन्ही पक्षांच्या मिळून 30 जागा होत आहेत आणि बहुमतासाठीही 30 जागांची आवश्यकता आहे. याशिवाय एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची एक जागा निवडून आली आहे. तसंच निवडून आलेले दोन अपक्ष कुणाला साथ देणार? यावरही सत्ता स्थापनेची गणितं अवलंबून असणार आहेत.
advertisement
लातूर जिल्हा परिषदेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची अहमदपूर, जळकोट आणि उदगीर या तीन तालुक्यांमध्ये युती झाली होती, पण उरलेल्या सर्व तालुक्यांमध्ये दोन्ही पक्ष वेगळे लढले होते. एकनाथ शिंदेंची शिवसेना या निवडणुकीत स्वबळावर मैदानात उतरली होती.
लातूर जिल्हा परिषदेच्या 59 जागांपैकी काँग्रेस 53, भाजप 50, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 26, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार 9, शिवसेना एकनाथ शिंदे 31 आणि शिवसेना उद्धव ठाकरे 9 जागांवर निवडणूक लढले होते.
advertisement
लातूर जिल्हा परिषद विजयी : 59/59
भाजप : 18
काँग्रेस : 23
शिवसेना : 01
शिवसेना UBT: 01
NCP अजित पवार : 12
NCP शरद पवार : 01
वंचित : 00
मनसे : 01
अपक्ष : 02
Location :
Latur,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 6:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Latur ZP Election : सुनेत्रा वहिनी ठरणार किंगमेकर! लातूरची समीकरणं बदलली, भाजपला मोठा धक्का









