advertisement

HBD Hema Malini: एकेकाळी 'या' कारणामुळे हेमा मालिनीला मिळत नव्हतं काम; अनेकदा झेलले नकार

Last Updated:

हेमा मालिनी यांनी आजवर 100 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. मात्र सुरुवातीच्या काळात त्यांना इंडस्ट्रीमध्ये जम बसवणं सोपं नव्हतं. अनेक दिग्दर्शकांनी त्यांना नाकारलं होतं. तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. त्यामुळे आज इतकी मोठी उंची त्यांना गाठता आली.

हेमा मालिनी
हेमा मालिनी
मुंबई, 16 ऑक्टोबर : अभिनय आणि नृत्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलेल्या अभिनेत्री खासदार हेमामालिनी यांचा आज (16 ऑक्टोबर 23) 75 वा वाढदिवस आहे. आजवर 100 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. मात्र सुरुवातीच्या काळात त्यांना इंडस्ट्रीमध्ये जम बसवणं सोपं नव्हतं. अनेक दिग्दर्शकांनी त्यांना नाकारलं होतं. तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. त्यामुळे आज इतकी मोठी उंची त्यांना गाठता आली. ‘झी न्यूज’नं त्या बाबत वृत्त दिलं आहे.
एक काळ असा होता, जेव्हा ड्रीमगर्ल हेमामालिनीला पाहण्यासाठी लोक चित्रपटगृहांबाहेर रांगा लावायचे. शोले, सीता और गीता यांसारख्या सुपरहीट चित्रपटांमुळे त्यांच्या करिअरला नव्या उंचीवर नेऊन ठेवलं. मात्र सुरुवातीला या क्षेत्रात दाखल झाल्यावर हेमामालिनी यांना त्यांच्या शिडशिडीत अंगकाठीमुळे चित्रपटात काम मिळेनासं झालं होतं. तरीही त्या डगमगल्या नाहीत.
मनोरंजन क्षेत्रांतल्या रिपोर्ट्सनुसार, करिअरच्या सुरुवातीला हेमामालिनी खूपच बारीक होत्या. त्यामुळे ऑडिशनसाठी गेल्यावर त्यांना नकार मिळायचा. बरेच नकार पचवल्यानंतर अखेर त्यांना एक तमिळ चित्रपट मिळला. तो चित्रपट स्वीकारल्यानंतर दिग्दर्शकानं त्यांचं नाव बदलून सुजाता असं ठेवलं होतं. मात्र शूटिंग सुरू झाल्यावर 4 दिवसांत त्यांनी हेमामालिनी यांना काढून टाकलं.
advertisement
संपत्तीच्या बाबतीत नवऱ्यालाही टक्कर देते ड्रीम गर्ल; अभिनयासोबत 'या' क्षेत्रातून करतात कमाई
असं म्हणतात, की हेमामालिनी यांनी अनेक नकारांचा सामना केला, पण तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांच्या लूकवर काम करण्यासोबतच त्यांनी शास्त्रीय नृत्यही शिकायला सुरुवात केली. शास्त्रीय नृत्यात पारंगत झाल्यानंतर त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीला हेमा यांनी अनेक छोट्या भूमिका केल्या. मग एके दिवशी त्यांना ‘सपनों के सौदागर’ हा चित्रपट मिळाला. या चित्रपटामुळे त्यांचं नशीब बदललं. रिपोर्ट्सनुसार, हेमामालिनी यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
advertisement
हेमा यांनी अभिनेते धर्मेंद्र यांच्याशी लग्न केलं. चित्रपटांबरोबरच त्यांनी त्यांची नृत्यसाधनाही सुरू ठेवली. हेमामालिनी या तमिळ कुटुंबातल्या असून काही तमिळ चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीकडे त्यांनी वाटचाल केली. त्यांना आजवर अनेक फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात त्यांचे अनेक चित्रपट सुपरहीट ठरले. धर्मेंद्र आणि राजेश खन्ना यांच्याबरोबर त्यांनी सहकलाकार म्हणून सर्वाधिक चित्रपट केले आहेत. देशभरात त्यांची लोकप्रियता आजही दिसून येते. सध्या त्या भाजपच्या खासदार आहेत त्याचबरोबर टीव्ही जाहिरातींमध्येही दिसतात. चाहत्यांच्या मनात या ड्रीमगर्लनं अढळ स्थान मिळवलं आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
HBD Hema Malini: एकेकाळी 'या' कारणामुळे हेमा मालिनीला मिळत नव्हतं काम; अनेकदा झेलले नकार
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement