मोहम्मद सिराज 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात? मुंबईत झाले स्पॉट, काय करत होते? VIDEO VIRAL
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Mohammad Siraj Dating Life: विराट-अनुष्का ते केएल राहुल-अथियापर्यंत अनेक जोड्यांनी चाहत्यांना वेड लावलंय. यातच आता आणखी एका जोडीच्या नावाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे.
मुंबई: सध्या सगळीकडेच अगदी क्रिकेटमय वातावरण निर्माण झालं आहे. कालच आयपीएलची सुरुवात झाली असून आपल्या आवडत्या टीमला सपोर्ट करण्यासाठी चाहत्यांनी जंगजंग पछाडलं आहे. अशातच चाहत्यांना एक वेगळंच सरप्राइज मिळालं आहे. अनेकदा बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वातील लोकप्रिय सेलेब्सच्या जोड्या बनताना आपण पाहत आलो आहोत. अशातच या दोन इंडस्ट्रीतून आणखी एक जोडी बनत असल्याचं चाहत्यांच्या नजरेत आलं आहे. या जोडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
परत एकदा जमली बॉलिवूड-क्रिकेटची जोडी
विराट-अनुष्का ते केएल राहुल-अथियापर्यंत अनेक जोड्यांनी चाहत्यांना वेड लावलंय. यातच आता आणखी एका जोडीच्या नावाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. ही जोडी दुसरी कोणी नसून मोहम्मद सिराज आणि माहिरा शर्मा आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि 'बिग बॉस १३' फेम अभिनेत्री माहिरा शर्मा यांच्यातील केमिस्ट्री सध्या सोशल मीडियावर धिंगाणा घालते आहे. नुकतंच मुंबईतील एका कॅफेबाहेर त्यांना स्पॉट करण्यात आलं आहे. त्यांच्या या सीक्रेट भेटीनंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना हवा मिळाली आहे.
advertisement
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये माहिरा आणि सिराज एकाच कॅफेमध्ये दिसले. मात्र, त्यांनी ही भेट सर्वांपासून लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असला, तरीही नेटकऱ्यांच्या नजरेतून काहीही सुटत नाही. या व्हायरल व्हिडिओमध्ये सिराज कॅफेच्या बाहेर आपल्या चाहत्यांना भेटताना आणि त्यांच्याशी संवाद साधताना दिसला, तर दुसरीकडे माहिरा शर्मा कॅफेमधून बाहेर पडून लगबगीने आपल्या कारकडे जाताना दिसली. जरी ते एकाच फ्रेममध्ये किंवा एकाच टेबलावर दिसले नसले, तरी एकाच वेळी एकाच ठिकाणी असणं चाहत्यांच्या नजरेतून सुटलं नाही.
advertisement
Mohammed Siraj with his girlfriend Mahira Sharma returning to the team hotel after watching Dhurandhar 2.
DSP Siraj & Mahira together. pic.twitter.com/FeY5R7Fn8L
— Sonu (@Cricket_live247) March 29, 2026
व्हायरल झाला सिराज-माहिराचा व्हिडीओ
ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा सिराज आणि माहिराच्या डेटिंगबाबत चर्चा होत आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्ये सिराजने माहिराच्या काही इंस्टाग्राम पोस्ट्स लाईक केल्या होत्या, तेव्हापासूनच या दोघांच्या नात्याबद्दल तर्क लावले जात होते. २०२५ साली माहिराने या अफवा नाकारल्या होत्या. सिराजनेही त्याच्या इन्स्टास्टोरीमधून या बातम्या फेटाळल्या होत्या. मात्र, काही वेळातच सिराजने ही स्टोरी डिलिट केली होती. त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या अफवांना अधिक बळ मिळाले होते. अशातच या नव्या व्हिडिओनंतर या जुन्या अफवा पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.
advertisement
माहिरा शर्माबद्दल बोलायचं झालं, तर तिने २०१७ मध्ये 'यारों का टशन'मधून मालिका विश्वात डेब्यू केलं होतं. त्यानंतर तिने 'नागिन ३', 'कुंडली भाग्य' आणि 'बेपनाह प्यार' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. इतकंच नाही, तर माहिराने ५० हून अधिक म्युझिक व्हिडिओत काम केलं असून 'लेहंगा' हे तिचं गाणं प्रचंड गाजलं होतं. मात्र, बिग बॉस १३ मधून माहिराला तुफान लोकप्रियता मिळाली. या शोमुळेच ती देशातील घराघरात पोहोचली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 7:21 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
मोहम्मद सिराज 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात? मुंबईत झाले स्पॉट, काय करत होते? VIDEO VIRAL










