जान्हवी अन् खुशीने पप्पांसोबत मिळून विकले मुंबईतील 'ते' चार फ्लॅट्स; प्रत्येक फ्लॅटची किंमत वाचून फुटेल घाम
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
बोनी कपूरच्या लेकी जरी आता चित्रपटांमधून लाखो रुपये पैसे कमवत असल्या तरी त्यांच्या वडिलांनीही चांगली संपत्ती कमावून ठेवली आहे. आता त्यांचे वडील बोनी कपूर आणि जान्हवी आणि खुशी यांनी त्यांचे चार फ्लॅट विकले असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई, 23 डिसेंबर : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या दोन्ही मुली जान्हवी कपूर आणि खुशीने आता बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं आहे. जान्हवीने 'धडक' या चित्रपटातून अभिनयसृष्टीत एंट्री घेतली होती. तिने आजवर अनेक चित्रपटांमधून आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. तर त्यांची धाकटी लेक खुशीने नुकतेच 'द आर्चीज' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. दोन्ही बहिणी नेहमीच चर्चेत असतात. तर बोनी कपूरही आपल्या लेकींविषयी कौतुक व्यक्त करतात. बोनी कपूरच्या लेकी जरी आता चित्रपटांमधून लाखो रुपये पैसे कमवत असल्या तरी त्यांच्या वडिलांनीही चांगली संपत्ती कमावून ठेवली आहे. आता त्यांचे वडील बोनी कपूर आणि जान्हवी आणि खुशी यांनी त्यांचे चार फ्लॅट विकले असल्याची माहिती समोर आली आहे.
ETimes च्या वृत्तानुसार, चित्रपट निर्माते बोनी कपूर आणि त्यांच्या मुली खुशी कपूर आणि जान्हवी कपूर यांनी मुंबईतील अंधेरी भागातील त्यांचे चार अपार्टमेंट विकले आहेत. हे फ्लॅट अंधेरीच्या ग्रीन एकर्स भागात आहेत. हिंदुस्तान टाईम्सच्या दुसर्या रिपोर्टमध्ये या किमतीचा खुलासा करण्यात आला असून हे फ्लॅट 12 कोटींहून अधिक किमतीत विक्री झाल्याचे सांगण्यात आले आहे. दोन फ्लॅट 6.02 कोटींना विकले गेले, तर आणखी दोन फ्लॅट 6 कोटींना विकले गेले.
advertisement
'या' कारणामुळं नवऱ्यानंही अर्ध्यावर सोडली साथ; सलमान खानच्या 'या' अभिनेत्रीवर आलीय घरकाम करण्याची वेळ
मीडिया रिपोर्ट्सनुसार, खुशी आणि जान्हवीच्या चार अपार्टमेंटपैकी सर्वात मोठ्या फ्लॅटचे क्षेत्रफळ 1870 स्क्वेअर फूट होते. तो सिद्धार्थ नारायण आणि अंजू नारायण यांना विकली गेली आहे. याशिवाय इतर दोन फ्लॅट्सचे एकूण क्षेत्रफळ 1614 स्क्वेअर फूट असून त्यांना मुस्कान बहिरवानी आणि ललित बहिरवानी यांच्या रूपाने नवीन मालक मिळाले आहेत.
advertisement
जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर, तिने 2018 मध्ये धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर जान्हवी कपूर मिली, गुड लक जेरी, गुंजन सक्सेना: द कारगिल गर्लसह अनेक चित्रपटांमध्ये दिसली. ती शेवटची अभिनेता वरुण धवनसोबत 'बवाल' या चित्रपटात दिसली होती. जान्हवी कपूरकडे आगामी काळात देखील अनेक चित्रपट आहेत. ती लवकरच 'मिस्टर अँड मिसेस माही' मध्ये दिसणार आहे. त्याचसोबत 'उल्झन' मध्येही ती दिसणार आहे. 'उल्झन'मध्ये जान्हवी कपूरसोबत गुलशन देवय्या, रोशन मॅथ्यू यांच्यासह अनेक कलाकार दिसणार आहेत.
advertisement
खुशी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, खुशी कपूरने तिची बहीण जान्हवी आणि आई श्रीदेवी यांच्या पावलावर पाऊल ठेवत झोया अख्तरच्या 'द आर्चीज'मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झाला. खुशी व्यतिरिक्त या चित्रपटात सुहाना खान, अगस्त्य नंदा, युवराज मेंडा, मिहिर आहुजा, वेदांग रैना आणि अगस्त्य नंदा देखील होते. करण जोहरच्या आगामी प्रोजेक्टमध्ये खुशी लवकरच सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्याच्या बातम्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 23, 2023 6:04 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
जान्हवी अन् खुशीने पप्पांसोबत मिळून विकले मुंबईतील 'ते' चार फ्लॅट्स; प्रत्येक फ्लॅटची किंमत वाचून फुटेल घाम