हिरो नव्हे व्हिलन! 'झुंड' चित्रपटाचा कलाकार हकनाक मेला, गुन्ह्यासाठी वापरलं टॅलेंट, खुंखार इतिहास

Last Updated:

Jhund Movie Actor Priyanshu Chhetri News: प्रसिद्ध दिग्दर्शन नागराज मंजुळे यांच्या झुंड चित्रपटात काम केलेल्या एका कलाकाराची मंगळवारी मध्यरात्री हत्या करण्यात आली.

News18
News18
Jhund Movie Actor Priyanshu Chhetri Murder: प्रसिद्ध दिग्दर्शन नागराज मंजुळे यांच्या झुंड चित्रपटात काम केलेल्या एका कलाकाराची मंगळवारी मध्यरात्री हत्या करण्यात आली. प्रियांशू छेत्री असं हत्या झालेल्या कलाकाराचं नाव आहे. त्याने अमिताभ बच्चनसोबत भूमिका साकारली होती. तो पट्टीचा फूटबॉल पटू देखील होतं. झुंड चित्रपटातील त्यांची भूमिका छोटीच होती. पण ती अनेकांच्या लक्षात राहिली. त्याच्याकडे टॅलेंट तरीही तो वाया गेला. गुन्हेगारीमुळे तो हकनाक मेला. मित्र ध्रुव साहूने त्याचे हातपाय दोरीने बांधून त्याचा निर्घृण खून केला आहे.
झुंड चित्रपटातील एका कलाकाराची अशाप्रकारे हत्या केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. पण मयत प्रियांशूचा देखील खुंखार इतिहास राहिला आहे. त्याने आपलं टॅलेंट गुन्हे करण्यासाठी वापरलं. चित्रपटात काम केल्यानंतर देखील त्याने गुन्हेगारी सोडली नाही. चित्रपट आल्यानंतरही त्याला एका प्रकरणात अटक झाली होती. अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांसोबत त्याचा वावर होता.

हिरो नव्हे व्हिलनच

advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांशू छेत्री हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर एक दोन नव्हे तर तब्बल १५ गुन्हे दाखल आहेत. घरफोडी आणि चोरीसह सुमारे १५ गुन्हे दाखल आहेत. ज्याने प्रियांशूची हत्या केली, तो ध्रुव साहू देखील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत.

नेमकं हत्या कशी झाली?

जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारा परिसरातील गंगोत्री लॉनजवळ ध्रुव साहूने नावाच्या मित्राने प्रियांशची हत्या केली आहे. प्रियांशू हा काही दिवसांपूर्वी नारा रोड परिसरात राहायला आला होता. याच परिसरात आरोपी देखील राहत होता. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. नारा रोड परिसरात यायच्या आधी प्रियांशू लुंबिनी नगरमध्ये त्याच्या कुटुंबासह राहत होता.
advertisement

आधी तारेनं बांधलं मग खेळ खल्लास

मंगळवारी मध्यरात्रीनंतर ध्रुव शाहू आणि प्रियांशु छेत्री यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. ध्रुव यांनी छेत्रीवर तारेने हल्ला केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. प्रियांशु त्याला मारेल या भीतीने आरोपीने प्रथम त्याला तारेने बांधले आणि नंतर त्याची हत्या केली. परिसरातील रहिवाशांनी त्याला जिवंत असल्याचे समजून रुग्णालयात नेले. मात्र प्राथमिक तपासणीत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृताच्या बहिणीच्या तक्रारीवरून, जरीपटका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. या हत्येप्रकरणी आणखी संशयित असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
हिरो नव्हे व्हिलन! 'झुंड' चित्रपटाचा कलाकार हकनाक मेला, गुन्ह्यासाठी वापरलं टॅलेंट, खुंखार इतिहास
Next Article