advertisement

कधीकाळी मिळायचे फक्त 50 रुपये, आता एका गाण्यासाठी 10 लाख घेतो 'हा' गायक; नेटवर्थ वाचून व्हाल थक्क

Last Updated:

एका मुलाखतीत कैलाशने यांनी सांगितले की, गायनात करिअर करण्यापूर्वी त्यांनी एका मित्रासोबत हस्तकलेचा व्यवसाय केला होता, पण त्यांच्या नशिबात काही वेगळंच लिहिलेलं होतं.

कैलाश खेर
कैलाश खेर
मुंबई, 06 नोव्हेंबर :   आपल्या आवाजाच्या जादूने करोडो लोकांच्या हृदयावर छाप सोडणारे कैलाश खेर हे बॉलिवूडमधील दिग्गज गायकांपैकी एक आहेत. कैलाश खेर यांची गायकी प्रत्येकाला एक वेगळी अनुभूती देते. कैलाश हे भारतीय लोकसंगीत आणि सुफी संगीतासाठी ओळखले जातात. त्यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानासाठी 2017 मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला आहे. आजच्या काळात कैलाश खेर यांचा बँड हा सर्वात बिझी बँड आहे. त्यांच्या देश-विदेशात कॉन्सर्ट सुरू आहेत. पण कैलाश खेर यांचा हा प्रवास फार सोपा नव्हता. त्यांनी अनेक संकटांना तोंड देत हे यश मिळवलं आहे. नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी एकेकाळी आत्महत्येच्या विचारांशी कसा लढा दिला याविषयी खुलासा केला आहे.
कैलाश खेर यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती, त्यामुळे त्यांनी लहान वयातच घर सोडून गायनात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. कैलाश खेर यांनी वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या आवेशात घर सोडले. पण त्यांना त्यानंतर कोणत्या संकटांचा सामना करावा लागला याविषयी खुलासा केला आहे.
Rashmika Mandanna : 'हे खूपच भीतीदायक...' व्हायरल व्हिडिओप्रकरणी रश्मिका मंदान्नाची पहिली प्रतिक्रिया समोर
एका मुलाखतीत कैलाशने यांनी सांगितले की, गायनात करिअर करण्यापूर्वी त्यांनी एका मित्रासोबत हस्तकलेचा व्यवसाय केला होता, पण त्यांच्या नशिबात काही वेगळंच लिहिलेलं होतं. दिल्लीत जन्मलेले कैलाश हे एका काश्मिरी कुटुंबातून आलेले आहेत, त्यांचे वडील मेहरसिंग खेर हे देखील भारतीय लोकसंगीत गायक होते.
advertisement
कैलाश यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती आणि वयाच्या अवघ्या 4 व्या वर्षी त्यांनी संगीतात आपली प्रतिभा दाखवायला सुरुवात केली. शिक्षणानंतर कैलाश खेर यांनी घर सोडले आणि विचित्र नोकऱ्या करून आपला उदरनिर्वाह चालवला. त्यांनी सांगितले की, जेव्हा त्यांना कोणतेही काम मिळत नव्हते, तेव्हा त्यांनी काही मुलांना संगीताचे धडे दिले. त्या काळात कैलाश 50 रुपये फी घेत असत.
advertisement
नंतर कैलाश उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे गेले आणि गंगेच्या काठावर आपल्या आवाजाची जादू पसरवू लागले.ऋषिकेशमध्ये जेव्हा ते गाणी म्हणायचे आणि लोक त्यांच्या आवाजावर नाचायचे, तेव्हा त्यांना दैवी अनुभूती मिळायची. ऋषिकेशमध्ये गंगेच्या काठावर असलेल्या आश्रमांबाहेर आरतीच्या वेळी कैलाश खेर रोज त्यांच्या आवाजात एक गाणे म्हणायचे, ते ऐकून तिथे उपस्थित ऋषी-मुनीही नाचू लागायचे. एके दिवशी गायकाचा आवाज ऐकून एक साधू म्हणाले, तुझ्या आवाजात जादू आहे, इतकी काळजी करू नकोस. भोलेनाथ सर्वकाही ठीक करेल. महंतांचे म्हणणे ऐकून त्यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि ऋषिकेशहून मुंबईला आले. इथून त्यांच्या करिअरमधला संघर्ष सुरु झाला.
advertisement
View this post on Instagram

A post shared by Kailash Kher (@kailashkher)

advertisement
कैलाश यांना नंतर जिंगल्स गाण्याची संधी मिळाली. कैलाशने आतापर्यंत 2000 हून अधिक जिंगल्स गायल्या आहेत आणि ते भारत सरकारच्या वतीने जिंगल्सला आवाज देतात. अनेक प्रयत्नांनंतर त्यांना अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राच्या 'अंदाज' मध्ये एक सूफी गाण्याची संधी मिळाली ज्याचे शीर्षक 'रब्बा इश्क ना होवे' आहे.
कैलाशने हे गाणे इतक्या उत्कटतेनं गायलं की जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा या गाण्याने त्यांना रातोरात स्टार बनवलं. यानंतर 'अल्लाह के बंदे' गाणं आलं आणि कैलाश तरुणांमध्ये तुफान लोकप्रिय झाले. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. 50 रुपयांपासून सुरू झालेला कैलाश खेरचा प्रवास आता 35 दशलक्ष रुपयां पर्यंत येऊन पोहोचला आहे. गायकाची एकूण संपत्ती 35 दशलक्ष रुपये आहे आणि एका गाण्यासाठी तो 9 ते 10 लाख रुपये आकारतो. कैलाश खेर तेलुगु गाणी देखील गातात.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
कधीकाळी मिळायचे फक्त 50 रुपये, आता एका गाण्यासाठी 10 लाख घेतो 'हा' गायक; नेटवर्थ वाचून व्हाल थक्क
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement