advertisement

Rashmika Mandanna : 'हे खूपच भीतीदायक...' व्हायरल व्हिडिओप्रकरणी रश्मिका मंदान्नाची पहिली प्रतिक्रिया समोर

Last Updated:

अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती लिफ्टमध्ये एंट्री करते. तिनं फार ढिगळे कपडे घातले असून विचित्र पद्धतीनं ती बॉडी फ्लॉंट करताना दिसतेय. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त करण्यात केलाय. आता या सगळ्या प्रकरणावर रश्मिकाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

 रश्मिका मंदान्ना
रश्मिका मंदान्ना
मुंबई, 06 नोव्हेंबर :  अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आली आहे. तिचा एक खोटा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्काच बसला. अनेकांनी हे खूपच धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील यावर नाराजी व्यक्त करत त्यावर कारवाई करण्याची मागणी केली. आता या सगळ्या प्रकरणावर रश्मिकाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती लिफ्टमध्ये एंट्री करते. तिनं फार ढिगळे कपडे घातले असून विचित्र पद्धतीनं ती बॉडी फ्लॉंट करताना दिसतेय. या व्हिडीओमध्ये दिसणारी मुलगी अभिनेत्री रश्मिका मंदाना नसून दूसरीच कोणीतरी आहे. AI च्या माध्यमातून हा व्हिडीओ मॉर्फ करण्यात आलाय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता याचा ओरिजनल व्हिडीओ देखील समोर आला आहे. आता या प्रकारावर सोमवारी, 6 नोव्हेंबर रोजी रश्मिकाने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
Video : रश्मिका मंदानाचा 'तो' व्हिडीओ पाहून भडकले बिग बी; थेट केली कारवाईची मागणी
ती म्हणाली, ''असा व्हिडीओ केवळ माझ्यासाठीच नाही तर प्रत्येकासाठी खूप भीतीदायक आहे. तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे आज लोकांचे खूप नुकसान होत आहे. आज एक महिला आणि एक अभिनेत्री म्हणून मी माझे कुटुंब, मित्र आणि चाहत्यांची आभारी आहे जे माझे संरक्षण आणि समर्थन करत आहेत. पण मी शाळा किंवा कॉलेजमध्ये असताना माझ्यासोबत हे घडलं असतं तर मी ते कसे हाताळले असते याची कल्पनाच करू शकत नाही. "
advertisement
advertisement
ती पुढे म्हणाली, ''आमच्यापैकी अधिक लोकांना अशा घटनेचा त्रास होण्याआधी एक समुदाय म्हणून आम्ही त्वरित याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तिच्या ट्विटमध्ये, रश्मिकाने सायबराबाद पोलीस आणि महाराष्ट्र सायबर, महाराष्ट्रासाठी सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी नोडल एजन्सी यांचे अधिकृत हँडल टॅग केले आहे.
रश्मिकाला तिच्या पोस्टवर लोकांनी पाठिंबा दिला. एका यूजरने लिहिले की, 'आम्ही यात तुमच्यासोबत आहोत!!! तंत्रज्ञानाच्या अशा गैरवापराचा सामना करण्यासाठी आपण जागरूकता वाढवू आणि एकत्र काम करू या. यामध्ये तुम्ही एकटे नाही आहात आणि आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. दुसरा म्हणाला, 'या व्हिडिओवर नंतर कारवाई करण्यापेक्षा आत्ताच कारवाई करणे चांगले.' एका व्यक्तीने असेही लिहिले की, 'खोट्या व्हिडिओंमुळे होणारे नुकसान पाहून निराशा होत आहे. तंत्रज्ञानाच्या गैरवापराच्या परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि एकमेकांना ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यासाठी एकत्र काम करूया.
advertisement
रश्मिकाची फेक क्लिप व्हायरल झाल्यानंतर अमिताभ यांनी रिट्विट करत यावर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी असे म्हटले होते. व्हिडिओमध्ये दिसणारी महिला झारा पटेल असून ती ब्रिटिश महिला आहे. तिचे सोशल मीडियावर प्रचंड फॉलोअर्स असून गेल्या महिन्यात त्याने व्हिडिओ अपलोड केला होता. अभिषेक नावाच्या एका एक्स युजरने याचा खुलासा केला होता.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Rashmika Mandanna : 'हे खूपच भीतीदायक...' व्हायरल व्हिडिओप्रकरणी रश्मिका मंदान्नाची पहिली प्रतिक्रिया समोर
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement